Rain Alert: पावसाळा संपला असं वाटत असलं तरी हवामान विभागाने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील चार ते पाच दिवस देशभरातील तब्बल 15 राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्र दिल्ली राजस्थान ते जम्मू कश्मीर असा मोठा पट्टा पावसाच्या तडाख्यात सापडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे अनेक भागांमध्ये शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे पीकच नव्हे तर शेती देखील पाण्याने वाहून गेली आहे. राज्यात अनेक ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागण्या केल्या जात आहे.
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
महाराष्ट्रात अजूनही पावसाचे सावट कायम राहणार आहे. कोकण व गोव्यात तीन आणि चार ऑक्टोबरला जोरदार पाऊस होणार आहे. 4 ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि घाटमात्याच्या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांसाठी हा पाऊस वरदान ठरू शकतो पण अनेक शेतकऱ्यांसाठी हा पाऊस पिकाचे नुकसान करणारा ठरू शकतो.
हे पण वाचा| दसऱ्याच्या आधी महागाईचा भडका! एलपीजी गॅस सिलिंडर महागला; जाणून घ्या नवीन दर
उत्तर भारतात मुसळधार पाऊस
राजस्थानच्या पूर्व भागात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तर भारतातील हवामान अचानक बदलले आहे. सहा ऑक्टोबर पर्यंत जम्मू-काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. उत्तर प्रदेश मध्ये चार ते सहा ऑक्टोबर दरम्यान ढगाची गडगडाट, वादळी वारे आणि पाऊस होण्याची शक्यता आहे. दिल्ली एनसीआर मध्ये तर एक ऑक्टोबर पासून पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. Rain Alert
पूर्व आणि मध्य भारतातही पावसाचा इशारा
पूर्व भारतातही पावसाचा जोर कायम असून पश्चिम बंगालच्या किनारी भागात दोन ते तीन ऑक्टोबर झारखंडमध्ये दोन ते सहा ऑक्टोबर तर विहार मध्ये चार ते पाच ऑक्टोबर रोजी जोरदार पाऊस होणार आहे. मध्यप्रदेश छत्तीसगड आणि उडीसा मध्ये मुसळधार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सिक्कीम मध्ये तीन ते पाच ऑक्टोबर दरम्यान पाऊस कोसळणार असून ईशान्यकडील आसाम मेघालय मध्ये 3 ऑक्टोबर रोजी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून अनेक ठिकाणी नद्या नाल्यांना महापूर येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनेचे पालन करावे अनावश्यक प्रवास टाळावा स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे संरक्षण करावे पावसापूर्वी शेतीतील काम पूर्ण करून घ्यावे. शेतकऱ्यांसाठी पाऊस हा वरदान ठरत असला तरी अनेक वेळा याच पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान देखील होते.

1 thought on “Rain Alert: महाराष्ट्रासह या 15 राज्यांसाठी पुढील पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे; मुसळधार पावसाचा इशारा…”