Ramayana First Look : रणबीरचा ‘राम’ अवतार, तर यशचा ‘रावण’ हा टिझर पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील!


Ramayana First Look | मनातील एक वेगळी श्रद्धा, डोळ्यासमोर ठेवून आजारावर गाथा आणि हृदयात दाटलेली भक्ती… हे सगळं पुन्हा एकदा अनुभवला मिळणार आहे. कारण अखेर अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर रणबीर कपूरच्या बहुप्रशिक्षित रामायण सिनेमाचा पहिला लूक आणि टीझर प्रदर्शित झाला आहे. मात्र सिनेमा रामायण या नावाने नाही तर रामायणम् या भव्य नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पहिल्या जनकीत भागवत श्रीरामाची झलक, रावणाचा रुद्र रूप आणि ब्रम्हांडाचा नवा इतिहास उलगडतांना दिसतो. हे टिझर पाहून अंगावर शहारे येणे नक्कीच आहे! Ramayana First Look

श्रीरामाच्या भूमिकेत रणबीर कपूर

आता आपल्याला या टीझरमध्ये रणबीर कपूरचा राम अवतारात पहिल्यांदाच समोर आलाय. साधेपणा, शौर्य आणि आत्मविश्वास यांचं अदितीय मिश्रण असलेल्या या रामाच्या चेहऱ्यावरची दृढता आणि डोळ्यातलं तेज थेट मनात भिडलं. झाडांवरून उड्या मारणारा, तीर कमान हातात घेतलेला रणवीरचा राम एक नवा पवित्र अध्याय उघडतोय. त्याच्या हातातली अंगठी विशेष लक्ष वेधून घेते. तिच्या मागेही एखादी दैवी कथा दडलेली असावी असेच वाटते.

रावणाच्या भूमिकेत रॉकिंग स्टार यश

तर टीझर च्या शेवटी आपल्याला रावण प्रकट होताना पाहायला मिळतो. आणि तो देखील कोणी साधा नाही रॉकिंग स्टार यश! काळोख्यातून उगम पावणारा, स्वतःचा रौद्ररूप झाकून ठेवलेला हा रावण खरोखरच भयंकर वाटतो. त्याच्या आवाजाची दहशत, त्याची उंची आणि त्याच्या डोळ्यातला राग सगळच काळजात धडकी भरवते. हा रावण देव, ऋषी, मानव आणि राक्षस यांच्या संतुलनाला हादरवणारा आहे.

खाली दिलेला टिझर पहा

दिवाळी 2026 आणि दिवाळी 2027 – दोन भागांत प्रदर्शित होणार

‘रामायणम्’ हा सिनेमा दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग दिवाळी 2026 ला, तर दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये येणार आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली आणि नामित मल्होत्रा यांच्या प्रॉडक्शनमध्ये ही कलाकृती आकार घेत आहे.

1 thought on “Ramayana First Look : रणबीरचा ‘राम’ अवतार, तर यशचा ‘रावण’ हा टिझर पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील!”

Leave a Comment

error: Content is protected !!