रेशन कार्डमधील चूक घरबसल्या मोबाईलरून फक्त 5 मिनिटांत दुरुस्त करा; जाणून घ्या सोपे पद्धत


Ration Card Update: रेशन कार्ड हे अतिशय महत्त्वाचे कागदपत्रे बनले आहे. तुमच्याकडे ही रेशन कार्ड असेल तर त्याचा वापर केवळ स्वस्त धान्य मिळवण्यासाठीच केला जात नाही तर अनेक सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील केला जातो. यामध्ये शेतकरी सवलत, महिला योजना, गॅस सबसिडी, वृद्ध पेन्शन अशा अनेक योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. मात्र जर यात चुकून चुकीची माहिती भरली गेली असली तर ती तुमच्या कामात अडकाठी आणू शकते. त्यामुळे ही चूक दुरुस्त कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

अनेक वेळा तुमच्या रेशनवर नावाचे स्पेलिंग चुकलेले असते. काही जणांच्या जन्मतारखेमध्ये चुका असतात. पत्ता बदलला तरी अपडेट होत नाही, किंवा कुटुंबातील एखादा सदस्य जोडला/काढला जात नाही. अशा छोट्या चुकांमुळे सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही. कधी कधी तर या चुकांमुळे रेशनकार्डचा काहीच फायदा होत नाही. Ration Card Update

रेशन कार्ड वरील कोणत्या चुका दुरुस्त करता येतात?

  • नावाची स्पेलिंग बदलणे किंवा नाव बदलणे
  • जन्मतारीख दुरुस्त करणे
  • नवीन पत्ता अपडेट करणे
  • आधार क्रमांक लिंक करणे
  • कुटुंबातील सदस्यांची जोडणी/काढणी करणे
  • नवीन फोटो लावणे

हे पण वाचा| SBI ची जबरदस्त योजना! फक्त एकदाच गुंतवणूक करा अन् 10 वर्षे मासिक उत्पन्न मिळवा..

मोबाईल वरून दुरुस्ती कशी करावी?

आता रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी सरकारी ऑफिसच्या चक्रा मारायची गरज नाही. घरबसल्या मोबाईलवर बसून तुम्ही फक्त पाच मिनिटात हा बदल करू शकता.

  • सर्वप्रथम अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर mahafood.gov.in भेट द्या.
  • त्यानंतर ration card update किंवा correction या पर्यायावर क्लिक करा.
  • त्या ठिकाणी तुमचा रेशन कार्ड नंबर आणि आधार नंबर टाका.
  • तुमच्यासमोर तुमचे कार्ड डिटेल्स दिसेल. दुरुस्ती करायची माहिती निवडा आणि चुकीची माहिती बरोबर करून भरा.
  • त्यासाठी आवश्यक असणारे पुरावे स्कॅन करून अपलोड करा.
  • त्यानंतर सबमिट या पर्यावरण क्लिक करा.
  • तुम्हाला अर्ज क्रमांक मिळेल याच क्रमांकावरून नंतर अर्ज ची स्थिती तपासता येईल.

जर तुमच्या परिसरामध्ये इंटरनेट कनेक्शन नसेल किंवा मोबाईलवर काम करणं कठीण होत असेल, तर अशा नागरिकांनी जवळच्या सीएससी केंद्रावर भेट देऊन हे काम पूर्ण करून घ्यावे. किंवा तलाठी कार्यालय संग्राम केंद्र किंवा महसूल मंडळात जाऊन फॉर्म भरून देखील तुम्ही हे काम पूर्ण करू शकता. आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन गेल्यास तिथेही अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या रेशन वरील चुकीची माहिती दुरुस्त करून भेटेल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “रेशन कार्डमधील चूक घरबसल्या मोबाईलरून फक्त 5 मिनिटांत दुरुस्त करा; जाणून घ्या सोपे पद्धत”

Leave a Comment

error: Content is protected !!