Recruitment For Group C Post Under MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) गट क सेवा मुख्य परीक्षेसाठी मोठी आधीसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. एक जून रोजी झालेल्या पूर्व परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून तब्बल 24 हजार 740 उमेदवार या पुढच्या टप्प्यासाठी पात्र ठरले आहेत. आता या पात्र उमेदवारांसाठी मुख्य परीक्षा 21 सप्टेंबर 2025 रोजी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे येथे घेण्यात येणार आहे. यंदा गट क सेवेअंतर्गत एकूण 1618 पदांची भरती होणार असून त्यात उद्योग निरीक्षण 39 पदे, तांत्रिक सहाय्यक 9, कर सहाय्यक 482 आणि लिपिक टंकलेखक 17 पदांचा समावेश आहे. मात्र शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार या पदसंख्येमध्ये आणि आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी वेळोवेळी एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन याबद्दल माहिती तपासने आवश्यक आहे.
या मुख्य परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2025 आहे. शुल्क भरण्यासाठी बँक चलनाची सुविधा 25 ऑगस्टपर्यंत ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे अर्ज करताना उमेदवारांनी गट क सेवेतील सेवा वर्गासाठी विकल्प निवडणे आवश्यक असणार आहे. लिपिक टंकलेखक सेवा वर्गासाठी तर नियुक्ती प्राधिकरणानुसार पसंतीक्रमही नमूद करावा लागणार आहे. मुख्य लेखी परीक्षेतील गुणवत्ता क्रम आणि अर्जातील विकल्प लक्षात घेऊन लिपिक टंकलेखक बेलीफ लिपिक आणि कर सहाय्यक या पदासाठी टंकलेखक कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची निवड होणार आहे. Recruitment For Group C Post Under MPSC
याचा अर्थ असा होतो की केवळ लेखी परीक्षा मध्ये चांगले गुण मिळवणे पुरेसे ठरणार नसून. इतर आवश्यक कौशल्य चाचणी ही मिळवणे गरजेचे आहे. राज्यातील अनेक तरुणांसाठी ही भरती एक सुवर्णसंधी ठरू शकते. सरकारी नोकरीचे स्वप्न बाळगणाऱ्या अनेक गरजवंत विद्यार्थ्यांसाठी ही आनंद वार्ता आहे. गेल्या अनेक महिन्यापासून अभ्यासात झोपून दिलेल्या उमेदवारांसाठी आता निर्णायक क्षण जवळ आला आहे. 21 सप्टेंबरला त्यांच्या करिअरमध्ये नवा टप्पा निर्माण होऊ शकतो. मात्र यासाठी काटेकोर अभ्यास वेळेचे नियोजन आणि मानसिक तयारी खूप महत्त्वाची ठरणार आहे.
सरकारी नोकरीच्या स्पर्धात्मक वातावरणात केवळ पात्र ठरणे नव्हे तर गुणवत्ता क्रमात वरचढ राहणे फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे ही संधी होऊ नये, अशीच प्रत्येक उमेदवारांची इच्छा असणार आहे आता पाहूया 26 हजाराहून अधिक स्पर्धकांमधून कोण मुख्य परीक्षा साठी बाजी मारू शकेल आणि गट क सेवेत आपले नाव पक्के करू शकेल. अर्ज करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आमच्या टीमच्या वतीने बेस्ट ऑफ लक तुम्ही सरकारी नोकरीसाठी केलेल्या सर्व परिश्रमाला यश मिळावे हीच आमची इच्छा आहे.
