१ सप्टेंबर पासून या ७ नियमात होणार मोठा बदल! तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम


Rules Change: सप्टेंबर महिन्यात अनेक आर्थिक बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. तसेच त्याचा तुमच्या मानसिक खर्चावर देखील परिणाम होऊ शकतो. दर महिन्याप्रमाणे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. जे सामान्य नागरिकांच्या आर्थिक जीवनावर डायरेक्ट परिणाम करतात. सप्टेंबर मध्ये आयटीआर फायलिंग, यूपीएस, भारतीय डाक आणि क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होत आहेत. त्याचबरोबर एलपीजी गॅस सिलेंडर, जेट फ्लू आणि सीएनजी पीएनजी च्या किमतीत देखील बदल होण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया सप्टेंबर महिन्यात नवीन बदल काय होणार आहेत.

आयकर विभागाने यावर्षी आयटीआर भरण्याची अंतिम तारीख 30 जुलै पर्यंत वाढून 15 सप्टेंबर 2025 केली होती. यामुळे करदात्यांना रिटर्न्स फाईल करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला होता. आता ही मुदत या महिन्यात संपणार आहे त्यामुळे तुम्हाला 15 सप्टेंबर पर्यंत आयटीआय फाईल करावा लागणार नाही तर तुम्हाला सरकारकडून नोटीस येऊ शकते.

राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईल पेन्शन योजना निवडण्यासाठी शेवटची तारीख 30 सप्टेंबर ठेवण्यात आली आहे. यापूर्वी ही तारीख 30 जून होती त्यामध्ये वाढ करून 30 सप्टेंबर करण्यात आली होती. Rules Change

1 सप्टेंबर 2025 पासून भारतीय डाक विभागाने देशातील डाग सेवेचे स्पीड पोस्ट सेवेमध्ये विलनीकरण केले आहे. आता तुम्ही कोणताही डाक पाठवण्यासाठी केवळ स्पीड पोस्ट सेवेचा वापर करू शकता.

हे पण वाचा| पोस्ट ऑफिसच्या ‘या’ भन्नाट योजनेत मिळवा 5 लाख रुपये! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक; जाणून घ्या सविस्तर

एसबीआय कार्डाने 1 सप्टेंबर 2025 पासून आपल्या काही कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. या नवीन बदलानुसार, आता तुम्ही काही विशिष्ट क्रेडिट कार्डवर डिजिटल गेमिंग आणि सरकारी वेबसाईटवरील व्यवहारांसाठी रिवॉर्ड पॉईंट्स मिळू शकणार नाही.

इंडियन बँक आणि आयडीबीआय बँक सारख्या काही बँकांनी विशेष मुदतीच्या एफडी योजना सुरू केल्या आहेत. इंडियन बँकच्या 444 दिवस आणि 555 दिवसाच्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे. त्याचबरोबर आयडीबीआय बँकेच्या 444 दिवस, 544 दिवस आणि 700 दिवसाच्या विशेष एफडी योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख देखील 30 सप्टेंबरच आहे.

ऑइल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सीएनजी पीएनजी आणि जेट फ्युल च्या किमतीतही बदल होत असतो. त्यामुळे एक सप्टेंबर रोजी या इंधनाच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे.

दर महिन्याप्रमाणेच एक सप्टेंबर रोजी एलपीजी सिलेंडरच्या किमती देखील जाहीर केला जातील. यामध्ये देखील वाढ किंवा घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या अनेक महिन्यापासून व्यावसायिक सिलेंडरच्या किमती घसरत आहेत. ऑगस्टमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 33.50 ने कमी होऊन दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडर 1631.50 रुपयांना मिळत होता. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत आठ एप्रिल 2025 पासून बदललेली नाही. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी यामध्ये बदल होऊ शकतो.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!