SBI Annuity Deposit Scheme: आजकाल प्रत्येक जण सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असतात. अशावेळी सरकारी हमी असलेली सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI). या बँकेत केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित मानली जाते. तुम्ही देखील सुरक्षित गुंतवणूक करून दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळू इच्छित असाल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. गावात राहत असो किंवा शहरात आपल्याला सगळ्यांना महिन्याच्या शेवटी पैशाची गरज भासते. शेतीमाल विकून मिळणारे उत्पन्न, नोकरीचा पगार किंवा व्यवसायातून होणारे उत्पन्न यामध्ये चढ-उतार होत असतो. अशावेळी जर एखादी योजना अशी असेल जी तुम्हाला दर महिन्याला हमखास ठराविक रक्कम मिळून देऊ शकते. तर अशीच एक एसबीआय ची सुरक्षित एन्युटी डिपॉझिट स्कीम.
SBI एन्युटी डिपॉझिट स्कीम म्हणजे ग्राहकाने एकाच ठिकाणी एकत्रित रक्कम जमा करायची आणि मग त्या रकमेवर मिळणारे व्याज आणि मूळधन दर महिन्याला ठराविक हप्त्यामध्ये परत मिळवायचे. बँक ईएमआय पद्धतीने पैसे परत करते यातील सर्वात मोठा फायदा म्हणजे जो व्याजदर एफडी साठी लागू केला जातो तोच व्याजदर या योजनेसाठी देखील लागू होतो. त्यामुळे ग्राहकांना परताव्यात कोणताही तोटा सहन करावा लागत नाही.
या योजनेमुळे अनेक लाभार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मोठी मदत होते. व्याजाची गणना प्रत्येक तिमाही केली जाते आणि ती मूळ धनासोबत मिळून दर महिन्याला तुमच्या खात्यात जमा केली जाते. एकदा गुंतवणूक केल्यावर तुम्हाला किती महिने किती रक्कम मिळेल हे सुरुवातीपासूनच निश्चित केलेले असते. त्यामुळे अनिश्चित फ्रॉड होण्याची शक्यता नाही. SBI Annuity Deposit Scheme
हे पण वाचा| घरबसल्या पैसे कसे कमवायचे? जाणून घ्या ‘हे’ खास ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्ग
गुंतवणूक किती करावी व कालावधी किती?
- या योजनेत कमीत कमी 1000 रुपयापासून गुंतवणूक सुरू करू शकता.
- जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही.
- गुंतवणुकीची मुदत: 3, 5, 7 किंवा 10 वर्ष ठेवता येते.
- व्याजदर मुदतीनुसार ठरवला जातो, जास्त काळाची गुंतवणूक केल्यास व्याजदर अधिक मिळतो.
या योजनेत कोण गुंतवणूक करू शकतो?
एसबीआयच्या या योजनेमध्ये भारतीय रहिवाशी गुंतवणूक करू शकतो. यामध्ये अल्पवयीन असल्यास देखील गुंतवणूक करू शकतात मात्र त्यात पालकांचा समावेश असेल. सिंगल अकाउंट किंवा जॉइंट अकाउंट दोन्ही प्रकारचे खाते तुम्हाला या योजनेत उघडता येतात.
वारसदाराची सुविधा
या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना पूर्ण रक्कम काढता येते. त्यामुळे अशावेळी कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळते.
एसबीआयच्या या योजनेअंतर्गत ठेवलेल्या रकमेच्या 75 टक्के पर्यंत लोन किंवा ओव्हरड्राफ्ट घेता येतो. त्याचे हप्ते बँक थेट लोन खात्यात जमा करते. 15 लाख रुपये पर्यंतच्या ठेवीवर वेळेपूर्वीच निकाशी शक्य आहे. मात्र तर डिपॉझिटच्या नियमानुसार पेनल्टी लागू शकते. योजना प्रत्येकांना फायद्याची ठरू शकते कारण अडचणीच्या वेळात तुम्हाला निश्चित उत्पादन या योजनेअंतर्गत मिळू शकते.
2 thoughts on “SBI ची जबरदस्त योजना! फक्त एकदाच गुंतवणूक करा अन् 10 वर्षे मासिक उत्पन्न मिळवा..”