SBI Bank Requirement 2025 | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे जर तुम्ही देखील बँकेमध्ये नोकरी करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खरंच महत्त्वाची ठरणार आहे. कारण देशातील नामांकित स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत एक मोठी बंपर भरती राबवण्यात येत आहे. या पद भरतीमध्ये जवळपास 6589 पदे भरण्यात येणार आहे. या पद भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे आणि पात्रता काय वयोमर्यादा या सर्व गोष्टींची माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
देशभरात नामांकित असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत ज्युनिअर असोसिएट (Clerk) पदासाठी ही भरती राबवण्यात येत आहे. सरकारी बँकेत कायमची नोकरी आणि चांगला पगार ही एक तरुणांसाठी एक मोठी संधीच आहे. त्यासाठी अर्ज कसा करायचा ही माहिती खाली दिलेली आहे. या पद भरतीमध्ये एकूण 6589 जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती खरंच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी आहे तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा.
शैक्षणिक पात्रता
कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेला उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. म्हणजे, BA, B.COM, BSc, BBA, BCA वगैरे डिग्री असलेले विद्यार्थी पात्र ठरतात. SBI Bank Requirement 2025
वयोमर्यादा किती आहे?
अर्जदाराचे वय वीस वर्षापेक्षा कमी नसावा आणि 28 वर्षापेक्षा जास्त नसावं. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाचे नियमानुसार वयात सुट आहे.
अर्ज कधी आणि कुठे करायचा?
पद भरती मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट 2025 आहे आणि अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे अर्जाची वेबसाईट : sbiCo.in
तसेच निवड प्रक्रिया प्रिलिम परीक्षा, मुख्य परीक्षा, कागदपत्र तपासणी आणि नंतर थेट निवड या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील त्यामुळे तुम्ही कुठेही कशाही प्रकारे परीक्षा देऊ शकता. अशाच नवीन भरतीच्या माहितीसाठी आम्हाला फॉलो करत चला जेणेकरून तुम्हाला दररोज नवनवीन माहिती भेटत राहील.
1 thought on “SBI मध्ये बंपर भरती सुरू; नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी”