SBI New Rules: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आतापर्यंत मोफत असलेल्या ऑनलाइन IMPS (instant money payment service) सेवा आता सशुल्क होणार आहेत. 15 ऑगस्ट 2025 पासून SBI चे नवीन नियम लागू होणार आहेत. यामध्ये ठराविक रकमेपेक्षा जास्त पैसे ट्रान्सफर करताना ग्राहकांना शुल्क भरावा लागणार आहे.
काय आहे IMPS सेवा?
IMPS ही 24 तास 365 दिवस उपलब्ध असणारी त्वरित पैसे पाठवण्याची सुविधा आहे. इंटरनेट बँकिंग मोबाईल बँकिंग किंवा UPI च्या माध्यमातून केवळ काही सेकंदात एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे पोहोचतात. यामध्ये एका वेळी पाच लाख रुपयापर्यंत रक्कम पाठवता येते आतापर्यंत एसबीआयच्या ग्राहकांसाठी सेवा पूर्णपणे मोफत दिली जात होती. मात्र आता 15 ऑगस्ट पासून यावर नवीन नियम लागून शुल्क आकारला जाणार आहे. SBI New Rules
किती शुल्क आकारला जाईल?
एसबीआय ने जाहीर केलेल्या नवीन नियमानुसार–
- 25000 रुपयापर्यंत: शुल्क द्यावा लागणार नाही
- 25001 ते 1 लाख रुपयापर्यंत: 2 रुपये + GST
- 1 लाख ते 2 लाख रुपयापर्यंत: 6 रुपये + GST
- 2 लाख ते 5 लाख रुपयापर्यंत: 10 रुपये + GST
याआधी एसबीआयच्या ग्राहकांकडून ऑनलाईन IMPS व्यवहारासाठी एक रुपयाही शुल्क घेतला जात नव्हता. त्यामुळे आता मोठ्या रकमेच्या ट्रांजेक्शन वर हा नियम ग्राहकांच्या केसावर अतिरिक्त भर घालणार आहे.
हे पण वाचा| पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेमध्ये फक्त एकदाच पैसे जमा करा आणि दरमहा ₹9,250 मिळवा..
या ग्राहकांना मिळणार सूट?
सरकारी किंवा खाजगी कंपन्यातील काही विशेष पगार खातेदारांना जसे की DSP, CGSP, PSP, RSP, CSP, SGSP, ICSP आणि SUSP खातेधारक) या शुल्कातून सूट मिळणार आहे. या ग्राहकांसाठी ऑनलाईन व्यवहार मोफत राहणार आहेत.
शाखेतून व्यवहार केल्यास शुल्क लागणार का?
एसबीआयच्या बँक शाखेत जाऊन IMPS ट्रान्सफर केल्यास शुल्क मध्ये कोणताही बदल नाही शाखेतून ट्रान्सफर केल्यास रकमेप्रमाणेच दोन रुपये ते वीस रुपये प्लस जीएसटी लागू शकते.
इतर बँकाही शुल्क आकारणार का?
SBI प्रमाणे HDFC बँकेने आधीच IMPS शुल्का करण्यास सुरुवात केली आहे. आता एसबीआय ने हा निर्णय घेतल्यामुळे इतर सार्वजनिक आणि खाजगी बँकाही याच मार्गावर येण्याची शक्यता आहे. सध्या कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक IMPS ट्रान्सफरवर शुल्क आकारला जाणार आहे. मात्र त्यांची शुल्क रचना थोडी वेगळी आहे. थोडक्यात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देताना आता बँकाही त्यावर शुल्क आकारू लागल्या आहेत. ग्राहकांनी येत्या काही दिवसात आपल्या व्यवहाराचे नियोजन नवीन नियमानुसार करणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो.
2 thoughts on “SBI च्या ग्राहकांना मोठा धक्का! 15 ऑगस्टपासून ‘या’ सेवेसाठी द्यावे लागणार शुल्क, वाचा नवीन नियम”