SBI Recruitment : आज काल प्रत्येकाचे स्वप्न सरकारी नोकरी मिळवणे असते. पण प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळते असे देखील नाही. पण आपण प्रामाणिक प्रयत्न करणे खूप आवश्यक असते. तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. स्थिर भविष्य, चांगला पगार, सामाजिक प्रतिष्ठा आणि सुरक्षितता हे सगळं एकाच ठिकाणी मिळतं. ते म्हणजे देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये. दरम्यान एसबीआय कडून मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. ही तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सुवर्णसंधी आहे.
SBI मध्ये एकूण 6589 पदासाठी प्रोबेशनरी ऑफिसर (PO) भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती म्हणजे SBI मधील बंपर भरती मानली जात आहे. जर तुम्हाला देखील बँकिंग क्षेत्रात आपले करिअर घडवायचे असेल तर ही संधी चुकवू नका. या भरतीमध्ये तुमच्या आयुष्याचे सोनं होऊ शकते.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख किती?
SBI च्या या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. पण अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे हे लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2025 आहे. त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न पाहता लगेच अर्ज भरण्यास सुरुवात करा किंवा ऑनलाइन सेंटरवर जाऊन तुमचा अर्ज भरून घ्या.
शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा
- शैक्षणिक पात्रता: या भरतीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
- वयाची अट: 20 ते 28 वर्ष दरम्यान ठेवण्यात आली आहे.
- आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयामध्ये सवलत दिली जाते.
निवड प्रक्रिया
या भरतीत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम पहिली ऑनलाईन परीक्षा (प्रिलिम्स) द्यावी लागेल. त्यानंतर मुख्य परीक्षा (मेन) द्यावी लागेल. आणि सर्वात शेवटी मुलाखत घेतली जाईल. या सर्व टप्प्यातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना SBI मध्ये नोकरी करण्याची संधी मिळेल.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज शुल्क
एसबीआयच्या या मेगा भरतीसाठी अर्ज करताना 750 रुपये शुल्क भरावा लागेल. त्याचबरोबर अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करावे लागतील. SBI Recruitment
अर्ज कुठे करावा?
अर्ज करण्यासाठी एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. ज्याची लिंक आम्ही वरती दिली आहे त्यावर क्लिक करून भरती बाबतची सर्व सविस्तर माहिती अचूक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा व आपला अर्ज सबमिट करा.
आज अनेक तरुण सुशिक्षित बेरोजगार आहेत जे नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्या घरच्यांच्या त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत त्यांच्या भविष्याची काळजी आहे त्यांचे स्वतःचे अनेक स्वप्न आहेत हे सगळे मनात बाळगून धावपळ सुरू आहे. अशावेळी एसबीआय सारख्या नामांकित बँकेमध्ये नोकरीची संधी मिळणे म्हणजे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा बदल ठरू शकतो. म्हणूनच जर तुम्ही या भरतीसाठी पात्र ठरत असाल तर वेळ न घालता लगेच अर्ज करा. सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्याची हीच खरी वेळ आहे.
2 thoughts on “SBI मध्ये मेगा भरती! लगेच अर्ज करा, सरकारी नोकरी करण्याची हीच सुवर्ण संधी..”