Schemes for Womens : राज्य सरकार आणि केंद्र सरकार महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. त्या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक लाभ दिला जातो. कधी व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. परंतु आता महिलांना पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून चालवणारी योजना समोर आलेली आहे. जर तुम्हाला देखील महिन्याला निश्चित उत्पन्न मिळवायचे असेल तर ही योजना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती Schemes for Womens
भारत सरकारच्या एलआयसी कडून विमा सखी नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये महिला दरमहा 7 हजार रुपयापर्यंत कमवू शकता तेही घरून ते कसं एकदा जाणून घेऊया.
विमा सखी योजना म्हणजे काय?
एलआयसी अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या MCA म्हणजे महिला करियर एजंट योजनेअंतर्गत महिलांना विमा क्षेत्रात एजंट म्हणून काम करता येतं. सुरुवातीला LIC तर्फे दर महिन्याला ₹7000 रुपये स्टायपेंड मिळतो आणि त्याचबरोबर पॉलिसी विकल्यावर ते कमिशन वेगळच! घराबाहेर न पडताही उत्पन्नाचा रस्ता खुला झालेला आहे. Schemes for Womens
किती पैसे मिळतात?
पहिल्या वर्षी महिलांना सात हजार रुपये, दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये जर पहिल्या वर्षी विकलेल्या 65% पॉलिसी ऍक्टिव्हेट असतील तर आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये दुसऱ्या वर्षासारखी अट. याशिवा प्रत्येक वर्षी कमीत कमी 24 नवीन पॉलिसी विकल्या पाहिजेत आणि ₹48,000 कमिशन मिळवल पाहिजे.
पात्रता काय हवी ?
यामध्ये अर्जदाराचे वय 18 ते 70 वर्षे दरम्यान असावे. शिक्षण किमान 10वी पास असणे आवश्यक आहे ही कायम नोकरी नाही फक्त उत्पन्न मिळवून देणारी जबरदस्त योजना आहे. इच्छुक महिलांनी पासपोर्ट साईज फोटो आणि काही कागदपत्रे अपलोड करायचे आहे जसे की वयाचा पुरावा, पत्याचा पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते पासबुक, दहावीचे प्रमाणपत्र सर्व कागदपत्रांचे स्वाक्षरी केलेली प्रत. अपूर्ण अर्ज नाकारला जाऊ शकतो त्यामुळे फॉर्म काळजीपूर्वक भरा.
ही योजना महिलांसाठी खरंच एक उत्तम योजना आहे त्यासाठी महिलांनी अर्ज करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा घरबसल्या तुम्हाला सात हजार रुपये कमावण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. अशाच माहितीसाठी आम्हाला फॉलो करा.
(Disclaimer : वरील दिलेली माहिती न्यूज मीडिया आणि गव्हर्नमट वेबसाईटच्या आधारे आहे.)