जगायचं असेल तर लढावेच लागेल! साप आणि मुंगूस यांच्यातल्या वैराचं वैज्ञानिक कारण माहितीये का? जाणून घ्या सत्य…

Snake VS Mongoose Fight: आपल्या गावाकडे आपण नेहमीच एक गोष्ट ऐकली आहे. साप आणि मुंगूस जन्मापासूनच एकमेकांचे शत्रू आहेत. सापाचा आणि मुंगसाचा छत्तीसचा आकडा आहे असे म्हटले जाते. समजा एखाद्याला साप दिसला की लगेच म्हणतात मुंगूस असतं तर आता याची वाट लागली असती. पण खरंच या दोघांमध्ये एवढी दुश्मनी आहे का? हे केवळ गोष्टी पुरतं आहे का यामागे काही वैज्ञानिक कारण आहे? याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

अस्तित्वासाठीची झुंज

साप आणि मुंगूस हे दोन्ही प्राणी जगण्यासाठी सतत झगडत असतात. हे प्राणी जंगलात असो किंवा मनुष्य वस्तीवर यांना अन्न आणि सुरक्षा या दोन गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. सापाला मुंगूस आपल्या जीवासाठी धोका ठरू शकतो, असे वाटते तर मुंगूस सापाला आपला शत्रू नाही, तर आपल्या पिलांसाठी मोठ्या संकट बनू शकतो असं वाटतं. म्हणूनच जेव्हा हे दोघे समोरासमोर येतात तेव्हा ती फक्त शिखर नसती तर अस्तित्वाची लढाई असते. Snake VS Mongoose Fight

पिलांच्या संरक्षणासाठी लढणं हीच खरी मुंगसाची ताकद

अनेक वेळा आपण पाहतो सापावर मुंगूस नेहमीच भारी पडतो. याचं कारण असतं, साप माणसांच्या लहान पिल्लांची शिकार करतो म्हणून मुंगूस सापाशी प्राणपणाने लढतो. त्याच्यासाठी ही लढाई केवळ स्वतःचा जीव वाचवण्यापूर्ती मर्यादित नसून त्याच्या पिल्लांच्या संरक्षणासाठीची ही लढाई असते. आपली पुढील पिढी जगवायचे असेल तर लढावच लागेल, या कारणामुळे मुंगूस अगदी अंतकरणातून ही लढाई लढतो. त्यामुळे अनेक वेळा या लढाईमध्ये सापावर मुंगूस भारी पडल्याचे दिसते.

हे पण वाचा| सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा; वाचा सविस्तर

मुंगसाला नैसर्गिक लाभलेली खास शस्त्र

मुंगूस हा प्राणी लहान असला तरी निसर्गाने त्याला काही विशेष शस्त्र प्रदान केलेले आहेत.

  • मुंगसामध्ये चपळता आणि वेग असल्यामुळे सापाच्या झपाट्याने येणाऱ्या फण्यालाही तो चुकवू शकतो.
  • मुंगसाच्या शरीरामध्ये विषाविरुद्ध प्रतिकारशक्ती असल्यामुळे सापाचं विष त्याला लगेच संपू शकत नाही.
  • मुंगूस थेट सापाच्या मानेवर हल्ला करते. मुंगसाचे दात स्तिक्षण असतात आणि त्याचा अचूक हल्ल्यामुळे साप असाह्य होतो.

अंतिम लढाई कोण जिंकतो?

संशोधनानुसार, मुंगूस आणि साप यांच्यामध्ये दहा लढाया झाल्या तर त्यापैकी आठ लढाया मुंगूस जिंकतो. त्याची चपळाई वेग आणि विशाला न जो मानणारी ताकद त्याला वरचढ ठरवते. तरीही नागासारखे मोठे आणि अति विषारी साप कधीकधी मुंगसालाही हरवतात. ही लढाई फक्त दोन प्राण्यांचा संघर्ष नाही. ही निसर्गाच्या जीवन चक्राची रणनीती आहे. साप हा आपल्या विषावर अवलंबून असतो. मात्र मुंगूस आपल्या धैर्य आणि चपळाईवर अवलंबून असतो. दोघांच्या लढाईत कोण जिंकेल याचा निकाल प्रत्येक वेळा वेगळा लागू शकतो. पण या दोघांमधील प्रत्येक लढाई नेहमीच रोमांचक ठरते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!