नवरा-बायकोचा मराठमोळ्या गाण्यावर लय भारी डान्स; पाहणाऱ्यांची टाळ्यांनी दाद


Social media viral video : लग्न झाले की नवरा बायकोचं नातं रोजच्या संसारात जबाबदाऱ्यातून गुंतून जातं. पण काही जोडपी अशी असतात की, कुठल्याही कार्यक्रम असो वा छोटासा समारंभ, ते तिथे आपली खुशाली आणि प्रेमाचा रंग नक्की दाखवतात. सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ तुफान गाजत आहे ज्या मध्ये नवरा बायकोची ट्विनिंग पाहून तुम्हीही म्हणाल ही खरी जोडी! Social media viral video

मराठमोळ्या पारंपरिक वेशात सजलेला नवरा, आणि नटलेल्या, साडी नेसलेली नवरीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. गाण लागतं अरे ही नवरी असली, अरे ही मनात ठसली दोघे ही तालावर इतक्या लयीत नाचायला लागतात की, पाणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि टाळ्या दोन्हीही थांबत नाही. चेहऱ्यावरील हावभाव, गाण्याच्या बोलला जुळवलेली स्टेप, आणि एकमेकांमधील तो खास प्रेमाचा भाव… हे सगळं मनाला भिडणार आहे.

कुठल्या कार्यक्रमाचा हा व्हिडिओ आहे, हे स्पष्ट नाही, पण पार्श्वभूमीवर पाहून बसलेले हातात मोबाईल घेऊन भावना टिपतात. कदाचित गावातल्या लग्न सोहळ्याचा किंवा एखाद्या खास समारंभाचा हा प्रसंग असावा. पण यातील खरी मज्जा म्हणजे दोघेही स्टेजवर नाचताय पण मन मात्र अजून एकमेकांमध्ये हरवले.

हल्ली व्हायरल होणाऱ्या डान्स व्हिडिओमध्ये थोडा दिखावा, कृती हालचाली असतात. पण या जोडीचा डान्स पाहून लक्षात येतं की हा सगळा मनापासून आहे. म्हणून लोक सोशल मीडिया वरती याला प्रेमाचा वर्षाव करत आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!