Soyabean Market Price: राज्यातील बाजारात खरीप हंगामातील सोयाबीनचे आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्यभरात एकूण 8133 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. सोयाबीन हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी प्रमुख नगदी पिकापैकी एक आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये शेतकऱ्यांचे सोयाबीनला पिवळं सोनं म्हणून देखील ओळखला जातो. पण यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या अपेक्षाप्रमाणे दर मिळतोय का? असा प्रश्न अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. या लेखात आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
राज्यातील लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीन ची सर्वात जास्त आवक झाली आहे. या ठिकाणी तब्बल 2928 क्विंटल सोयाबीनचे अवक झाली आहे. लातूरमध्ये पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी 4300 रुपये दर मिळाला आहे तर सरासरी 4400 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. Soyabean Market Price
इतर प्रमुख बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ
यवतमाळ मध्ये सरासरी 4185 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. अकोला बाजार समितीमध्ये 4250 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. चिखली बाजार समितीमध्ये 4000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. लोणार मध्ये 4225 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. जामखेड मध्ये 4000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. सिंदखेड राजा या ठिकाणी सोयाबीनला 4200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. पिंपळगाव या ठिकाणी सोयाबीनला 4550 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. अमरावती मध्ये लोकल वाणाच्या सोयाबीनला 4248 रुपये दर मिळाला आहे. नागपूर मध्ये 4183 रुपये तर मेहकर मध्ये 4300 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
हे पण वाचा| या लाडक्या बहिणींना मिळणार नाही ऑगस्ट-सप्टेंबर हप्त्याचे ₹3,000, कारण काय? वाचा सविस्तर
सोयाबीनला हमीभाव मिळतोय का?
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सोयाबीनला हमीभाव मिळत आहे का? केंद्र सरकारने जाहीर केलेला किमान आधारभूत किंमत सोयाबीन साठी प्रतिक्विंटल साधारणपणे 5000 रुपये एवढी आहे. पण प्रत्यक्षात बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर 3700 ते 4500 दरम्यानच आहेत. यामुळे थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत आहे. शेतकरी दिवस रात्र मेहनत करून आपले पीक पिकवतो पण बाजारात त्याला योग्य भावना मिळाल्यामुळे त्याचे मोठे नुकसान होते. हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्याने अनेक शेतकरी आपला माल साठवून ठेवू लागले आहेत.
शेतकऱ्याचे नुकसान
शेतकरी आपली शेती पिकवण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत असतो. यामध्ये त्याच्या पिकावर अनेक नैसर्गिक आपत्या निर्माण होतात. या सर्व गोष्टींना तोंड देऊन शेतकरी आपले पीक पिकवतो. मात्र जेव्हा विकण्यासाठी बाजारात नेतो तेव्हा व्यापाऱ्यांच्या हातातच आपल्या कष्टाचे मोल असतं. सरकारने जरी हमीभाव जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात व्यवहारात हमीभावामध्ये सोयाबीन खरेदी केली जात नाही. आशा मध्ये शेतकऱ्याचे नुकसान होते व शेती पिकवण्यासाठी केलेला खर्च देखील उत्पादनातून निघत नाही.
भविष्यात सोयाबीनचे दर कसे राहतील?
सध्या बाजारात नवीन सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे दर घसरत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र सोयाबीन तेलाची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे सोयाबीनचे भाव लवकरच सुधारतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने बाजारात थेट हस्तक्षेप करून सोयाबीन किमान हमीभावाने खरेदी करण्याचे सक्त निर्देश दिले पाहिजेत. अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात केले जात आहे.

1 thought on “राज्यात सोयाबीनला किती मिळतोय दर? जाणून घ्या आजचा सोयाबीन बाजार भाव”