Soybean Market Price: मागील काही दिवसापासून सोयाबीनच्या किमतीत होणारी वाढ शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरत आहे. खरीप हंगामातील नवीन सोयाबीन मार्केटमध्ये येण्यासाठी आणखीन दोन अडीच महिने बाकी आहेत. मात्र त्यापूर्वीच जुन्या साठवलेल्या सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे. सोयाबीनच्या वाढत्या किमती पाहून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे. सध्याचे दर पाहता जुन्या सोयाबीनला अक्षरशः सोन्याचा भाव मिळत असल्याचे दिसत आहे.
सध्या वाशिम जिल्ह्यातील सोयाबीनला सर्वात जास्त दर मिळाला आहे. वाशिम मधील बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमाल दर चार हजार 700 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे. विशेष म्हणजे बुधवारी याच बाजार समितीमध्ये सोयाबीनला ४८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. हा सर्वात जास्त सोयाबीनचा दर आहे. कारंजा मनोरा आणि रिसोड यासारख्या इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर चार हजार पाचशे रुपयांच्या वर आहेत. Soybean Market Price
- वासिम: कमाल दर 4700 रुपये
- कारंजा: कमाल दर 4640 रुपये
- मानोरा: कमाल दर 4735 रुपये
- रिसोड: कमाल दार 4585 रुपये
हे पण वाचा| खुशखबर! लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरे यांनी सांगितली तारीख…
सोयाबीनचे दरवाढी मागे काय कारण आहे?
सोयाबीनच्या दरवाढी मागे अनेक कारणे मानली जातात. जागतिक स्तरावर खाद्यतेल आणि प्रोटीनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अमेरिकेतील सोयाबीनचा साठा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे जागतिक बाजारात सोयाबीनचा दर सकारात्मक असल्याचे दिसत आहे. अनेक देशांनी सोयाबीनच्या निर्यातीवर मर्यादा आणल्या आहेत. ज्यामुळे जागतिक सोयाबीनला मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नवीन सोयाबीन बाजारात येईपर्यंत सोयाबीनची मागणी अशीच कायम राहणार असल्याची शक्यता आहे. नवीन सोयाबीनला यावर्षी काय दर मिळतो हे पाण्यासारखे राहणार आहे.
त्याचबरोबर सध्या शेतकरी खरीप हंगामातील कामांमध्ये व्यस्त आहेत. तन काढणे किड नियंत्रण आणि अंतर्मशागत यासारख्या कामांमध्ये शेतकरी असल्यामुळे सोयाबीन घेऊन बाजारात येणे शक्य होत नाही. त्यामुळे बाजारात आवक कमी आहे आणि मागणी वाढत चालल्यामुळे दरामध्ये सुधारणा होत आहे. मागील हंगामातील दर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आर्थिक फटक्याचा सामना केला आहे.
हंगामाच्या सुरुवातीला दर 4700 रुपयांच्या आसपास होते पण नंतर ते चार हजार रुपयांच्या खाली घसरले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चही निघला नाही. यात कडू अनुभवामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विकली नाही, तर साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता याच साठवलेल्या सोयाबीनला सोन्याचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना आनंद मिळाला आहे. सध्या सुरू सुरू असलेली दरवाढी कायम राहणार की पुन्हा घसरणार याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आगामी काही आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती आयात निर्यात धोरणे आणि देशांतर्गत उत्पादन यावर पुढील दिशा स्पष्ट होईल.

1 thought on “सोयाबीनच्या दरात मोठी वाढ! जुन्या सोयाबीनला सोन्याचा भाव; वाचा सविस्तर”