Soybean Market Price: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मागील दोन वर्षात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सतत कमी भावात सोयाबीन विकावी लागत आहे यामुळे शेतकऱ्यांच्या वाट्याला फक्त निराशाच येत होती. कधी पावसाच्या लहरीपणामुळे तर कधी अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट होत होती. या सर्व नैसर्गिक नुकसानीचा फटका त्यांना बसत होता. अशा परिस्थितीत सोयाबीनला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांची असते. यावर्षी खरीप हंगाम सुरू होताच भाव काही प्रमाणामध्ये स्थिर होता. जुलै अखेरपर्यंत प्रतिक्विंटल चार हजार पाचशे रुपये इतका दर मिळत होता. सोयाबीनचे दर वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा माल घरातच साठवून ठेवला. पण सोयाबीनचे दर वाढत नसल्यामुळे अनेकांनी कमी दारातच सोयाबीन विक्री केली.
आता मात्र सोयाबीनच्या बाजारात अचानक तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये प्रचंड वाढ होत आहे. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल 4200 ते 4300 रुपये दर मिळत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनच्या दरामध्ये 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. परंतु ही वाढ शेतकऱ्यांच्या फायद्याची नसून व्यापाऱ्यांच्या फायद्याची ठरत आहे. कारण शेतकऱ्याकडून खरेदी केलेला माल व्यापाऱ्यांनी गोडाऊन मध्ये साठवून ठेवून आता बाजारात विक्रीसाठी आणला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसत आहे.
हे पण वाचा| आनंदाची बातमी! या 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 3200 कोटी रुपयाचा पिक विमा जमा होणार? जाणून घ्या सविस्तर
सोयाबीनचे दर वाढण्यामागील कारणे काय?
तज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन व सोया तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सोयाबीनचे दर वाढत आहेत. त्याचबरोबर प्रमुख उत्पादक भागातील सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्यामुळे देखील सोयाबीनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहतुकीतील अडचणीमुळे जागतिक स्तरावर पुरवठा घटला असून यामुळे देखील बाजारभावावर मोठा परिणाम दिसत आहे. त्याचबरोबर सोया तेलाच्या मागणीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम स्थानिक बाजारातील सोयाबीनच्या किमतीवर होत आहे. Soybean Market Price
शेतकऱ्यांच्या अपेक्षा
केंद्र सरकारने या खरीप हंगामासाठी सोयाबीनचा हमीभाव प्रत्येक क्विंटल 5328 रुपये निश्चित केला आहे. जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 436 रुपयाने अधिक आहे. तज्ज्ञांच्या मते यंदा बाजारामध्ये 5000 ते 5500 सोयाबीनला दर मिळू शकतो. पण त्यापेक्षा कमी दर मिळाल्यास शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागणार हे मात्र निश्चित आहे. नाफेडच्या खरेदी केंद्रावर अपुरा बारदाना विक्रीसाठी दोन-तीन दिवस प्रतीक्षा आणि पैशासाठी जास्त दिवस वाट पाहणे अशा अनेक अडचणींमुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांकडे माल विकणे पसंत केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना तात्काळ पैसे मिळतात मात्र दरामध्ये मोठा तोटा सहन करावा लागतो.
दरम्यान यावर्षी शेतकऱ्यांच्या खर्चात देखील वाढ होत आहे. खत, बियाणे, मजुरी यासारख्या सर्व खर्चांमध्ये वाढ झाली आहे. त्यात पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादनात मोठी घट होते आणि बाजारात कमी भाव मिळतो यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन शेती परवडत नाही. शेतकऱ्यांनी लागवडीसाठी केलेला खर्च देखील उत्पादनातून निघत नाही. अशी बिकट परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे बाजारात भाव वाढ शेवटी झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा आनंद घेता येत नाही. शेतकऱ्यांनी कमी दारात सोयाबीन विकली मात्र आता सोयाबीनचे दर जरी वाढले असले तरी शेतकऱ्यांना याचा काहीच फायदा होत नाही. पुढील हंगामात शेतकऱ्यांना किती दर मिळेल हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
1 thought on “Soybean Market Price: सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड वाढ! मात्र शेतकरी नाराज, काय आहे कारण? वाचा सविस्तर”