भारतातील असे दहा रेल्वे स्थानक ज्यांचं नाव घेताना लाज वाटते; ही विचित्र नाव ऐकून तुम्हीही हसायला लागल


Ten strange railway station names in India : भारतामधील रेल्वे ही देशाची आपली खरी शान आहे. याच रेल्वेने रोज लाखो प्रवासी प्रवास करतात, कुणी नोकरीसाठी, कुणी शिक्षणासाठी, कुणी नातेवाईकांकडे तर कोणी फक्त सहलीसाठी. ट्रेन ने प्रवास करणं म्हणजे खरंतर एक वेगळाच अनुभव. खिडकीतून दिसणारी पहिलं हिरवगार शेत, डोंगर, नद्या, जंगलं आणि त्यातील लहान-मोठी गावे. पण या प्रवासात एक गोष्ट अशी आहे की जी कधी सगळ्यांना हसवून सोडते ती म्हणजे रेल्वे स्थानकाचे नाव. Ten strange railway station names in India

साधारणपणे गावाचं परिसर किंवा एखाद्या ऐतिहासिक घटनेचे नाव घेऊन स्टेशनला नाव दिले जातात. परंतु भारतात काही असे ठिकाण आहेत ज्यांचे नाव इतकी विचित्र आहेत की हे ऐकून माणूस हसू लागेल. कुठे कोणाला लाज वाटते,  तर कुठे पोट धरून हसायला येतं. महाराष्ट्रातील एकच नाव म्हणजे भोसरी रेल्वे स्टेशन. पुण्यातील या गावाचं नाव जून नाव भोजापूर असलं तरी आता भोसरी असं नाव आहे, आणि हेच नाव स्टेशनला आहे. आता बोला एखाद्या प्रवाशांनी मोठ्या आवाजात मी भोसरीला उतरणार असं म्हटलं तर आजूबाजूचे लोक जोरात हसू लागतात. म्हणूनच या नावाबाबत अनेकदा बदलाची मागणी ही झाली.

पण केवळ महाराष्ट्रच नाही, तर देशभरामध्ये देखील दहा-बारा मजेदार नावाचे टेशन आहेत जी ऐकून कोणीही हसायला लागेल. पाहूयात भन्नाट उदाहरण.

  • दारु स्टेशन (झारखंड) : आता नावच असं आहे की ऐकताच लोक म्हणतात, “अरे, दारुला ट्रेन थांबते का रे?” झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात हे स्टेशन आहे.
  • गांडे स्टेशन (पश्चिम बंगाल) :  गिरिडीह जवळचं हे स्टेशन. गावाचं नाव गांडे असल्याने स्टेशनलाही हेच नाव पडलं. प्रवाशांना मात्र तिकीट काढताना चोरटं हसू येतं.
  • सुअर स्टेशन (उत्तर प्रदेश) : रामपूर जिल्ह्यातलं हे स्टेशन. नाव सुअर म्हणजे डुक्कर. त्यामुळे या स्टेशनावर उतरणाऱ्यांना मित्रांकडून नेहमीच चिडवलं जातं.
  • भोसरी स्टेशन (महाराष्ट्र) : पुण्यातील हे प्रसिद्ध नाव. घेताना लाज, पण खरं स्टेशन!
  • सिंगापूर रोड (ओडिशा) : परदेशातील सिंगापूरची आठवण करून देणारं हे नाव. पण प्रत्यक्षात ओडिशातलं छोटंसं स्टेशन.
  • काला बकरा (पंजाब):  जालंधरजवळचं हे स्टेशन. नाव ऐकून लोकांना गंमत येते पण हे गाव भारतीय सैनिक गुरबचन सिंहांसाठी प्रसिद्ध आहे.
  • तट्टी खाना (तेलंगणा):  आता नाव वाचा आणि कल्पना करा! ट्रेन इथे थांबली की लोक हसू दाबू शकत नाहीत.
  • बीबी नगर (हैदराबादजवळ) :  औरंगाबादची बीबीची कबर प्रसिद्ध असली तरी हैदराबादला बीबी नगर स्टेशन आहे.
  • दिवाना (हरियाणा):  नाव ऐकताच एखादा रोमँटिक चित्रपट आठवतो. पण खरं तर हे गावाचं नाव आहे.
  • सहेली (मध्य प्रदेश) : या नावाचं स्टेशन ऐकलं की लोक हसत म्हणतात, “अरे मी सहेलीला जातोय!”

अशा या नावांमुळे प्रवाशांच्या चेहऱ्यावर हमखास हसू येतं. प्रवास करताना साधारणपणे स्टेशनं फक्त चढउतारासाठी असतात, पण या विचित्र नावांच्या स्टेशनांमुळे लोकांना प्रवासाचा किस्सा बनतो. अनेकदा सोशल मीडियावर या स्टेशनांचे बोर्ड व्हायरल होतात आणि त्यावर लोक भन्नाट जोक्स मारतात.

भारतीय रेल्वे हा जगातला सर्वात मोठा रेल्वे नेटवर्क आहे आणि त्यात अशी अनेक गमतीदार स्टेशनं लपलेली आहेत. पण महाराष्ट्रातलं ‘भोसरी स्टेशन’ मात्र चर्चेत राहिलंय, कारण नाव घेताना प्रवाशांनाही हसू आवरत नाही आणि लाजही वाटते.

हे पण वाचा | वजन कमी करायच आहे? तर या गोष्टी नक्की फॉलो करा

Leave a Comment

error: Content is protected !!