Today Gold Rate: गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या बाजारभावामध्ये सातत्याने घसरण होत आहे. रक्षाबंधनाच्या सणापासून बाजारात सोन्याचे दर घसरत असल्याचे पाहायला मिळत आहे. सलग चार दिवसात जवळपास दोन हजार रुपयाची दहा ग्रॅम मागे घसरण झाले आहे. सोन्याच्या दारात होणारी उतरण पाहून खरेदीदारांची बाजारामध्ये गर्दी निर्माण झाली आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी बनू शकते. आजच्या दरामध्ये देखील किंचित घट झाल्याचे दिसून आले आहे. सातत्याने होणारे घसरण पाहून ग्राहकांची सोने खरेदीसाठी उत्साह वाढला आहे.
सोन्याचे आजचे ताजे दर
आज 14 ऑगस्ट 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 1,01,350 रुपये आहे. जो कालच्या तुलनेत पन्नास रुपयांनी कमी झाला आहे. 24 कॅरेट 10 तोळ्याची किंमत 10,13,500 रुपये तर 8 ग्रॅम साठी 81,080 रुपये द्यावे लागत आहेत. ची किंमत मागील काही महिन्याच्या तुलनेत कमी असल्यामुळे ग्राहकांची बाजारामध्ये गर्दी वाढली आहे.
22 कॅरेट सोन्याचा दर
22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये देखील आज घसरण झाली आहे. 22 कॅरेट सोने दागिने बनवण्यासाठी वापरले जाते. लग्नसराई मध्ये सर्वात जास्त या सोन्याचे खरेदी केली जाते. आज दहा ग्रॅम सोने 92 हजार 900 रुपये एवढे झाले आहे. आठ ग्रॅम साठी 74 हजार 320 रुपये द्यावे लागत आहेत. तर 22 कॅरेट 10 तोळा सोनं खरेदी करण्यासाठी 9 लाख 29 हजार रुपये द्यावे लागत आहेत. लग्न साखरपुडा किंवा इतर मोठ्या प्रसंगासाठी सोन्याची खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते.
हे पण वाचा| SBI च्या ग्राहकांना मोठा धक्का! 15 ऑगस्टपासून ‘या’ सेवेसाठी द्यावे लागणार शुल्क, वाचा नवीन नियम
18 कॅरेट सोन्याचा दर
18 कॅरेट सोन्याचा भाव मध्ये चाळीस रुपयाची घसरण झाले असून 10 ग्रॅम ची किंमत 76 हजार दहा रुपये इतकी झाली आहे. 10 तोळे 18 कॅरेट सोने खरेदी करण्यासाठी सात लाख 60 हजार 100 रुपये द्यावे लागत आहेत. 18 कॅरेट सोने डिझाईन दागिने तयार करण्यासाठी जास्त प्रमाणात वापरले जाते. Today Gold Rate
सोन्याच्या दरामध्ये घसरण का होत आहे?
सोन्याचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीवर अवलंबून असतात. चलनातील चढ-उतार आणि स्थानिक मागणी पुरवठ्यावर सोन्याचे दर अवलंबून असतात. अलीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाल्याने जागतिक पातळीवर सोन्याच्या खरेदीत घट झाल्याने भाव कमी झाले आहेत. भारतातही सण उत्सव संपल्यामुळे सोन्याची मागणी कमी झाली आहे. या कारणामुळे सोन्याच्या दरात घसरण होताना पाहायला मिळत आहे.
सोन्याचे दर कधीच स्थिर राहत नाहीत यामध्ये चढ-उतार कायम होत असतो. परंतु गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दारात झालेली घसरण पाहता अनेक लोकांनी खरेदीसाठी ओढ घेतली आहे. त्यांनी हीच सुवर्णसंधी साधली असून भविष्यात पुन्हा सोन्याचे दर वाढू शकतात. खेड्यापाड्यामध्ये लग्नाची तयारी करणाऱ्या कुटुंबांसाठी किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचा दिवस नक्कीच फायद्याचा ठरू शकतो. कारण सोने हे केवळ दागिने नसून आपल्यासाठी सुरक्षित गुंतवणुकीचे प्रतीक मानले जाते.