Today Gold Rate: सध्या सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. रक्षाबंधनापासून सातत्याने सोन्याचे दर घसरताना दिसत आहेत. दरम्यान श्रावण महिना सुरू असून गणेश उत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे अशा वातावरणात बाजारात सोन्याच्या खरेदीसाठी चांगलीच गर्दी सुरू होते. पण गेल्या काही दिवसापासून सोन्याचे भाव घसरत असल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत आहे. आज स्वातंत्र्यदिनानिमित्त सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या किमती आणखीन स्वस्त झाल्या आहेत. यामुळे सणानिमित्त सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,01,240 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. म्हणजेच कालच्या तुलनेत 110 रुपयांनी घसरला आहे. 24 कॅरेट दहा तोळे सोने तब्बल 1100 रुपयांनी घसरले आहेत. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. आज आठ ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 80,992 रुपये एवढा आहे.
आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात देखील घट झाली आहे. दागिने बनवण्यासाठी सर्वात जास्त वापरले जाणारे 22 कॅरेट सोने कालाच्या तुलनेत तब्बल 100 रुपयांनी घसरले आहे. आज बावीस कॅरेट सोन्याचा दर 92 हजार 800 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. 22 कॅरेट 10 तोडे सोने खरेदी करण्यासाठी नऊ लाख 28 हजार रुपये मोजावे लागत आहेत. जे कालच्या तुलनेत 1000 रुपयांनी कमी आहेत. 22 कॅरेट आठ ग्रॅम सोन्याचे दर 74 हजार 280 रुपये एवढे आहेत. Today Gold Rate
हे पण वाचा| पीएम किसान योजनेचे पैसे वाढणार? या तारखेला 21वा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता
18 कॅरेट सोन्याच्या किमतीत देखील घसरण झाली आहे. आज 18 कॅरेट दहा ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी 75 हजार 930 रुपये द्यावे लागत आहेत. म्हणजेच यामध्ये 80 रुपयाची घट झाली आहे. 18 कॅरेट आठ ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी 60744 रुपये द्यावे लागत आहेत. त्याचबरोबर दहा तोळे सोने खरेदी करण्यासाठी 7,59,300 रुपये मोजावे लागत आहेत.
सोन्याच्या किमतीत शिघसरण किती दिवस होईल याबद्दल काही सांगता येत नाही. कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी आणि पुरवठा डॉलरची किंमत व्याजदरातील बदल तसेच जागतिक राजकीय परिस्थितीवर सोन्याचे दर अवलंबून असतात. मात्र सध्यातरी बाजारपेठेत सोन्याचे भाव घसरत असले तरी त्यामध्ये पुन्हा कधी वाढ होईल सांगता येत नाही. त्यामुळे लग्नासाठी किंवा सणासुदीसाठी सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर हाच क्षण योग्य आहे असे समजून लगेच सोने खरेदी करण्यासाठी बाजारात जा.
Disclaimer: आम्ही दिलेल्या सोन्या-चांदीच्या किमती इंटरनेट द्वारे माहिती घेऊन दिलेले आहेत. यामध्ये जीएसटी टीडीएस आणि मेकिंग चार्जेस सारखे कर मिळवलेले नसतात. त्यामुळे आम्ही दिलेल्या सोन्याच्या किमतीत आणि स्थानिक ज्वेलर्स सोन्याच्या किमतीमध्ये थोडाफार फरक होऊ शकतो. अचूक दर जाणून घेण्यासाठी स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.