Todays Gold Rate: सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत आणि अशा काळात सोने खरेदी करण्याची आपल्या देशात परंपरा पहिल्यापासून आहे. पण या वर्षी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये चिंता दिसत आहे. सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसापासून सातत्याने चढ-उतार होताना दिसत होता. मात्र आज सोन्या चांदीच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे सोने खरेदी करायची की नाही असा प्रश्न ग्राहकांच्या समोर उपस्थित झाला आहे. या लेखामध्ये आपण आज सोन्याचे दर काय आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
आजचे सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचे दर
आज सोन्याच्या दरामध्ये प्रति तोळा 820 रुपयांची वाढ वाढ झाली आहे. यामुळे दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव एक लाख 2220 रुपये एवढा झाला आहे. याचाच अर्थ जर तुम्हाला दहा तोळे सोने खरेदी करायचे असेल तर तुम्हाला दहा लाख 22 हजार दोनशे रुपये द्यावे लागतील. यामध्ये आठ हजार दोनशे रुपयाची मोठी वाढ झाली आहे.
22 कॅरेट सोन्याचा दर
आज 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 750 रुपयाची वाढ झाली असून दहा ग्रॅम सोन्याचा दर 93 हजार 700 रुपये एवढा आहे. जर तुम्ही आठ ग्रॅम सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यासाठी 8176 रुपये द्यावे लागतील. या वाढत्या दरामुळे ग्राहकांची गर्दी बाजारामध्ये कमी झाली आहे. Todays Gold Rate
हे पण वाचा| या लाडक्या बहिणींना मिळणार नाही जुलै महिन्याचे 1500 रुपये; अपात्रतेचे कारण काय? जाणून घ्या सविस्तर
18 कॅरेट सोन्याचा दर
आज 18 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 620 रुपयांची वाढ झाली असून 18 कॅरेट सोन्याचा दर 76 हजार 670 रुपये एवढा आहे.
चांदीच्या दरात बदल
सोन्याच्या दारासोबत चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे मात्र चांदीच्या दरामध्ये जास्त वाढ झाली नसल्यामुळे ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. आज आठ ग्रॅम चांदीचा भाव 920 रुपये एवढा आहे तर 100 ग्रॅम चांदीसाठी 11500 रुपये मोजावे लागत आहेत.
सध्या सुरू असलेल्या सणासुदीचे दिवस आणि सोन्याच्या वाढत्या दरामुळे ग्राहक भ्रमात आहेत. सोन्यातील गुंतवणूक नेहमी सुरक्षित मानली जाते पण वाढत्या भावामुळे प्रत्येकाचे बजेट कमी पडत आहे. जर तुम्ही पण गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर काही वेळ वाट पाहणे तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. पण जर तुम्हाला सणासाठी किंवा लग्नासाठी सोने खरेदी करायचे असेल तर तुम्हाला आहे त्या किमतीतच सोने खरेदी करावे लागेल.
1 thought on “Todays Gold Rate: सोन्याच्या किमतीत 8200 रुपयांची मोठी वाढ; जाणून घ्या 10 ग्राम सोन्याची किंमत”