Tractor Subsidy Scheme : शेतकऱ्यांची शेती अधिक आधुनिक व्हावी, उत्पादन वाढावं आणि कष्ट कमी व्हावे त्यासाठी सरकारकडून नवीन नवीन योजना आणल्या जात आहेत. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा देखील होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अशातच शासनाची सध्या चर्चेत असलेली ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेत पात्र शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी थेट 3.15 लाख रुपये पर्यंतच अनुदान मिळतंय. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे. Tractor Subsidy Scheme
शेतात अजूनही कोणी बैल जोडीवर अवलंबून आहे, कुणी महागडी मजुरी देऊन नांगरणी करतोय, कुणी उधारी काढून ट्रॅक्टर भाड्याने आणतोय. पण या योजनेमुळे स्वतःचं ट्रॅक्टर घेणे शेतकऱ्याच आवक्यात आले. कारण सरकार थेट 90 टक्क्यांपर्यंत खर्च उचलणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील आणि मग ट्रॅक्टर खरेदी करणं सोपं होणार.
ट्रॅक्टर अनुदान मिळवण्यासाठी इथे क्लिक करा
आता प्रश्न पडतो कोण करू शकतो अर्ज? तर, अर्जदाराकडे किमान दोन हेक्टर जमीन असावी, महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा. शेतकरी वैयक्तिक पातळीवर किंवा बचत गटांच्या माध्यमातून अर्ज करू शकतो. म्हणजेच छोट्या शेतकऱ्यांनाही सामूहिक पद्धतीने या योजनेचा लाभ घेता येईल.
अर्जाची प्रक्रिया पण साधी आहे. MAHADBT पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा. लॉगिन करून योजना निवडायची, आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करायचा मग खात्यात थेट अनुदानाची रक्कम जमा होणार. काही दिवसातच योजनेचा फायदा प्रत्यक्ष हातात येतो.
कागदा पत्रांमध्ये काही मूलभूत गोष्टी लागणार आहेत जसे की आधार कार्ड, सातबारा उतारा, बँक पासबुकची प्रत, आणि गरज असल्यास उत्पन्न प्रमाणपत्र. एवढं झालं की तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होते.
या योजनेचे फायदे तर खूप आहेत. ट्रॅक्टर मुळे नांगरणी, पेरणी, पाणी देणं, काढणी अशा सगळ्या शेतीच्या कामात गती येते. मजुरीवरच ओझं कमी होतं. शेतीत खर्च कमी होतो आणि उत्पन्नात वाढ होते. आणि महत्त्वाचं म्हणजे वेळ वाचतो. म्हणजेच, सरकारची ही योजना शेतकऱ्यांसाठी खरंच दिलासा देणारी आहे. 3.15 लाख रुपयांच अनुदान ही गोष्ट छोटी नाही. ज्यांनी अटी पूर्ण केल्या आहेत त्यांना अर्ज करणे टाळून नाही. कारण ट्रॅक्टर म्हणजे फक्त यंत्र नव्हे, तर शेतकऱ्यांच्या स्वप्नाला गती देणारा साक्षीदार आहे.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे. अर्ज करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टल ला भेट द्या.)
