Tractor subsidy scheme: आजच्या काळात शेतकऱ्याला शेतीतून चांगलं उत्पन्न घ्यायचा असेल तर फक्त बैल जोडीवर आणि पारंपारिक शेतीवर अवलंबून राहून चालत नाही. आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. पण खरी समस्या म्हणजे या यंत्रसामग्रीची किंमत प्रचंड जास्त असल्यामुळे सामान्य शेतकरी. ट्रॅक्टर घ्यायचं म्हटलं तरी लाखो मध्ये खर्च येतो हीच अडचण ओळखून सरकारने शेतकऱ्यांसाठी खास योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 3.15 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
काय आहे योजना?
गावाकडच्या अनेक शेतकऱ्यांना नांगरणी पेरणी पाळी मोगरा यासाठी खाली बस तू खाली बसून सांग मजूर शोधावा लागतात. मजुरीचे दर दिवसान दिवस वाढत आहेत वेळेवर मजूर मिळाले नाही तर पिकाचे नुकसान होऊ शकते. अशावेळी मिनी ट्रॅक्टर सारखं यंत्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. याच कारणामुळे सरकारने शेतकऱ्यांना कमी किमतीत ट्रॅक्टर उपलब्ध करून द्यावा यासाठी ही ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू केली आहे.
किती अनुदान मिळणार?
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 90% अनुदान दिले जात आहे. म्हणजेच मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना सरासरी 3.15 लाख रुपये थेट आर्थिक लाभ बँक खात्यात मिळू शकतो. त्यामुळे अतिरिक्त कर्ज घ्यायची गरज भासणार नाही आणि शेतकरी बिंदासपणे आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टर द्वारे आपली शेती करू शकतो. Tractor subsidy scheme
कोणता शेतकरी अर्ज करू शकतो?
- अर्जदार शेतकऱ्याकडे किमान दोन हेक्टर जमीन असावी.
- शेतकरी महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
- अर्ज वैयक्तिक स्वरूपात किंवा बचत गटाच्या माध्यमातून करता येतो.
हे पण वाचा| व्हाट्सअप चे १० भन्नाट ट्रिक्स! कोणालाच माहित नाही, अनेक कामे होतील सोपी
अर्ज कसा करायचा?
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कुठेही जाण्याची गरज लागत नाही. फक्त महाडीबीटी पोर्टल वर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येतो.
- सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करा.
- त्यानंतर ट्रॅक्टर अनुदान योजना निवडा.
- आवश्यक माहिती भरा व कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज मंजूर झाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईल.
कोणती कागदपत्रे आवश्यक?
- आधार कार्ड
- सातबारा उतारा
- बँक पासबुकची प्रत
- आयकर प्रमाणपत्र
शेतकऱ्यांना कोणता फायदा मिळणार?
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतकाम जलद आणि कमी खर्चात करण्यासाठी मदत होणार आहे. मजुरी वरील खर्च कमी होईल व शेतमजुरावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. उत्पादनात वाढ होईल. लहान शेतकरी सामूहिक गट करून ट्रॅक्टरचा फायदा घेऊ शकतात. आजकाल शेतीसाठी अनेक नवीन तंत्रज्ञान आले आहेत पण तंत्रज्ञान महाग असल्यामुळे शेतकरी च्या हाती जात नाही. याच गोष्टीचा विचार करून सरकारने ही अनुदान योजना राबवली आहे. योग्य पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनी जर ही संधी साधली तर त्यांच्या शेतीतून आधुनिक उत्पन्न निघण्यास नक्कीच मदत होईल.