Tur Market Report | शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, 28 जून रोजी राज्यातील विविध बाजार समितीमध्ये तुरीच्या दरात मोठा चढउतार झालेला आहे. 33 हजार 960 क्विंटल तुरीची आवक झाली असून, लाल आणि गजर तुरीला भरघोस दर मिळाल्याचे चित्र आहे. विशेषता बीड, लातूर, अमरावती, नागपूर, हिंगणघाट, बार्शी आणि मलकापूर या बाजार समितीमध्ये चांगले दर मिळाले तर काही बाजारांमध्ये तुरीला खूप कमी प्रमाणात दर मिळाले आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे चित्र निर्माण झालेले आहे. Tur Market Report
राज्यामुळे सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये काही बाजारामध्ये तर जास्तीत जास्त 6785 रुपये असा दर मिळाला आहे तर सरासरी 5500 ते 6500 यादरम्यान दर मिळालेला आहे.
लाल तुरीचा बाजार भाव
लातूर बाजार समितीमध्ये ४०८७ क्विंटल तुरीची आवाज झाली, कमालदर 6560 रुपये तर सरासरी 6450 रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळालेला आहे
तर अमरावती बाजार समितीमध्ये 2079 आवक झाली, कमाल दर 6571, सरासरी 6485 रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळालेला आहे. तर नागपूर मध्ये 567 क्विंटल इतकी तुरीची आवक झाली, तर कमल दर 675 रुपये तर सरासरी 6556 इतका दर मिळालेला आहे.
तर हिंगणघाट बाजार समितीमध्ये 1151 क्विंटल, तुरीची आवक झालेली आहे तरी ते कमाल दर 6785 रुपये तर सरासरी 6200 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे. तसेच मालेगाव मध्ये विशेष लक्षवेधी ठरला आहे ते किमान दर फक्त 1701 रुपये प्रतिक्विंटल असा भेटला आहे तर सरासरी मात्र 5600 प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.
गजर तुरीचा व्यापार कसा होता
हिंगोली बाजार समितीमध्ये दोनशे क्विंटल तुरीची आवक झाली, इथे कमाल दर 6415 मिळाला तर सरासरी 6175 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे. तर मुरूम बाजार समितीमध्ये 184 कुंटल तुरीचे आवाज झाली तर कमाल दर 6351 रुपये सरासरी 6287 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे.
आज आपण बाजारभाव नजर टाकली तर हिंगणघाट नागपूर मलकापूर आणि अमरावतीमध्ये लाल तुरीला सर्वाधिक दर मिळाल्याचे दिसून येत आहे. विशेषता हिंगणघाट मध्ये 6785 रुपये पर्यंत कमल नागपूर मध्ये 6675 रुपये मलकापूर मध्ये 6700 प्रतिक्विंटल इतका दर मिळाल्याने त्या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! तुर बाजारात होणार मोठी वाढ!
1 thought on “तुर बाजारभावात मोठा चढ-उतार कोणत्या जिल्ह्यात मिळाला सर्वाधिक दर जाणून घ्या सविस्तर माहिती”