UPI Rule Change: भारतातील अनेक लोक आज दैनंदिन आयुष्यात यूपीआय वापरत असतात. किराणा आणण्यापासून दूधवाल्याचे पैसे देण्यापर्यंत किंवा एखाद्या मित्राला पाचशे रुपये उसने द्यायचे असले तरी मोबाईल मधून यूपी ॲपच्या माध्यमातून व्यवहार केला जात आहे. एखाद्या मॉलमध्ये शॉपिंगसाठी गेल्यानंतर तिथे देखील युपीएच्या माध्यमातून अगदी जलद गतीने व्यवहार केला जातो. अशा परिस्थितीत जर या सुविधेत थोडा बदल झाला तर याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर आणि वापरकर्त्यांच्या सवयीवर होऊ शकतो.
नॅशनल पेमेंट ऑपरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने मोठा निर्णय घेतला आहे. एक ऑक्टोबर 2025 पासून यूपीआय अँप मधील कलेक्ट रिक्वेस्ट म्हणजेच पैसे मागण्याची सुविधा बंद केली जाणार आहे. आजवर फोन पे, जीपे, पेटीएम सारख्या ॲपच्या मदतीने आपण आपण मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून पैसे मागू शकत होतो. फक्त समोरच्या व्यक्तीचा यूपीआय आयडी टाकायचा किती रक्कम हवी ते लिहायचं आणि रिक्वेस्ट पाठवायची. फक्त एवढं केल्यावर समोरचा व्यक्ती ओके केल्यात पैसे खात्या जमा व्हायचे. मात्र आता ही सुविधा सर्वसामान्य युजरसाठी उपलब्ध राहणार नाही.
कोणासाठी उपलब्ध असेल ही सुविधा?
यूपीआयच्या नवीन नियमानुसार हे सुविधा केवळ व्यापाऱ्यांसाठी मर्यादित करण्यात आली आहे. म्हणजेच आयआरसीटीसी, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन यासारख्या व्यापारी वेबसाईटवर तुमच्याकडे पेमेंट रिक्वेस्ट पाठवू शकतात. मात्र सध्या ग्राहक किंवा सामान्य युजर यापुढे दुसऱ्याकडे पैसे मागण्यासाठी ही पद्धत वापरू शकणार नाहीत. UPI Rule Change
हे पण वाचा| सावधान! लाडकी बहीण योजनेची eKYC करताय? रिकामे होऊ शकते बँक खाते, स्कॅम समोर
का घेण्यात आला हा निर्णय?
यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे ऑनलाईन फसवणूक थांबवणे. अनेकदा गैरप्रकार करणारे लोक बनावट कलेक्ट रिक्वेस्ट पाठवून लोकांकडून पैसे घेत होते. सामान्य लोकांना हे पैसे आले आहेत असं वाटून नकळत पिन टाकून पैसे स्वतःच पाठवले जात होते. त्यामुळे हजारो जण या स्कॅमचे बळी ठरले होते. म्हणूनच आधीही मर्यादा दोन हजार रुपयापर्यंत घटवण्यात आली होती मात्र आता पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील अनेक मित्र नातेवाईकांमध्ये थोडीफार उधारी असते. दोन हजार रुपये पाठव पुढच्या महिन्यात देतो असं आपण सहज सांगतो या व्यवहारात कलेक्टर रिक्वेस्ट खूप फायद्याची ठरत होती. मात्र आता ही सुविधा नसल्यामुळे लोकांना थेट पैशासाठी किंवा स्कॅन करून समोरच्याचे पैसे पाठवावे लागणार आहेत. म्हणजेच पैसे मागणं तितकं सोप राहणार नाही.
ही सुविधा सुरू का केली होती?
यूपीआयची ही सुविधा सुरू करण्यामागे अनेक उद्देश होते. व्यवहार सोपे करणे आणि देनी आठवण करून देणे. समजा एखाद्या मित्राने पैसे उदार घेतले तर थकबाकीची आठवण करून देण्यासाठी ही रिक्वेस्ट पाठवू शकत होता. पण आता फसवणूक करणाऱ्यांनी हा शॉर्टकट वापरल्यामुळे आता सर्वसामान्यांसाठी ही सुविधा बंद करण्यात आली आहे. यूपीआय ने खरंच आपल्या आयुष्यात नवीन बदल केला आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा एखादा व्यवहार करायचा असेल तेव्हा बँकेत रांगेत उभा राहावा लागायचे. आता मोबाईलवर फक्त काही क्लिक मध्ये सर्व काही क्षणात होत आहे. पण त्यासोबतच फसवणुकीच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत.

1 thought on “1 ऑक्टोबर पासून UPI मध्ये मोठा बदल! भारतातील कोट्यवधी UPI यूजरवर होणार थेट परिणाम”