Vikram Solar IPO : आज एक शेअर बाजारातून एक नवीन बातमी समोर आलेली आहे. सौर ऊर्जा क्षेत्रात काम करणारी विक्रम सोलार ही कंपनी शेअर बाजारात आपली एन्ट्री घेत आहे. खरं सांगताय तर, IPO ची घोषणा झाल्यापासून गुंतवणूकदारांमध्ये एक उत्सुकता निर्माण झाली होती. कारण एक तर सोलार एनर्जी हा भविष्यातील बाजार मानला जातो, आणि दुसरे म्हणजे IPO उघडतास लोकांनी अक्षरशः झडप घातली. Vikram Solar IPO
19 ते 21 ऑगस्ट दरम्यान खुल्या असलेल्या या 2,079 कोटी रुपयांच्या IPO ला गुंतवणूकदाराकडून मिळालेला प्रतिसाद भन्नाट होता. बघा ना, एकूण 54.63 पट सबस्क्रीप्शन झालय! त्यामध्ये रिटेल इन्व्हेस्टर्स ७.६५ पट, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार ५० पट तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार तर तब्बल १४२ पटांनी सहभागी झाले. म्हणजे साधं सांगायचं तर लोकांनी विक्रम सोलरवर डोळे झाकून विश्वास ठेवला.
आजचा कालपासून BSE आणि NSE या दोन्ही एक्सचेंज वर विक्रम सोलार चे शेअर्स सूचीबद्ध झालेले आहेत. आणि लिस्टिंग कशी होईल, प्रीमियम किती मिळेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले. ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे GMP सध्या 38 रुपयांवर पोहोचला आहे. याचा अर्थ, इशू प्राइज 332 रुपयांवरून शेअर अंदाजे 370 पर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच जवळपास 11.5% प्रीमियम.
गुंतवणूकदारांसाठी ही एक चांगली बाब आहे. कारण IPO घेतलेल्या लोकांना लिस्टिंगच्या दिवशीच नफा मिळण्याची संधी आहे. पण हो, इथेच लक्षात ठेवायचं की हा शेअर बाजार आहे. आज प्रीम आहे म्हणून उद्याही तसंच राहिल्याची खात्री नसते.
तज्ञांचे म्हणणं आहे की, IPO ला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसाद पाहता लिस्टिंग मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. आणि सौरऊर्जेच्या क्षेत्रात विक्रम सोलार चे योगदान लक्षात घेतलं तर दीर्घकाळ कंपनीला मोठे भविष्य आहे.
शेअर बाजारात आज सकाळी खास Special pre-Option Session ठेवण्यात आलं, आणि नेमकं दहा वाजता ट्रेडिंग सुरू झालं. त्यामुळे गुंतवणूकदारांची नजर स्क्रीनवर खेळली आहे.
आता प्रश्न पडतो की हा फक्त सुरतच आहे की खरोखरच विक्रम सोलार पुढे जाऊन मल्टी बॅगर ठरणार? उत्तर वेळच देईल. पण एवढं नक्की आहे आज विक्रम सोलरची एन्ट्री डे गुंतवणूकदारांसाठी खास ठरणार आहे.
(टीप: ही केवळ माहित आहे. गुंतवणूक करण्याआधी तज्ञांचा सल्ला घेणे गरजेच आहे. शेअर बाजारामध्ये जोखीम असते. सर्व माहिती प्रसार माध्यमांच्या आधारे आहे.)
बातमी लेखन : MaharashtraBatami Online Team
1 thought on “Vikram Solar IPO: शेअर बाजारात आज भव्य पदार्पण, ग्रे मार्केटने दाखवला जबरदस्त प्रीमियम”