Viral Dance Video: आजकाल सोशल मीडियाच्या जमाना आहे त्यामुळे अनेक जण आपलं टॅलेंट सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून दाखवतात. यासाठी एक मोबाईल आणि मनातील हाऊस पुरेशी असते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्या व्हायरल होत असलेला एक गावरान वहिनी साहेबांचा डान्स आहे. जुना पण सुपरहिट झालेलं काटा लगा हाय लगा या गाण्यावर या महिलेने गावरान ठेका धरला असून तिचा डान्स पाहून तुम्ही देखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.
खेड्यातील महिला आपलं आयुष्य घर मूल संसार आणि शेतीच्या जबाबदाऱ्या पार पाडवण्यात घालवतात. स्वतःसाठी वेळ कुठे आणि कसा काढावा असा प्रश्न निर्माण होतो. पण या महिलेने मात्र स्वतःच्या हौसेला प्राधान्य देऊन अंगणातच रील बनवून इंस्टाग्राम वर टाकली आणि बघता बघता हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला अनेक व्ह्यूज आणि लाईक मिळत आहेत. त्याचबरोबर अनेक जण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त करत आहेत.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये चहा त्याने कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिली आहे याला बोलतात गावरान टॅलेंट, तर आणखीन एका युजरने लिहिले आहे फेमस होण्यासाठी अंग प्रदर्शन करायची गरज नाही, या शेतकरी महिलांनी दाखवून दिलं फेमस कसं व्हावं. तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे. तुमच्या डान्स समोर हिरोइन पण मागे पडेल भारी नाचला वहिनीसाहेब. Viral Dance Video
हे पण वाचा| बापरे! आत्महत्या करणाऱ्या तरुणीला मृत्यूच्या तावडीतून वाचवलं; VIDEO पाहून अंगावर शहारे उभे राहतील..
या व्हिडिओमध्ये फक्त डान्स नाहीतर एक संदेश दडलेला आहे. गावातील सध्या महिलांकडे किती भारी कला दडलेली आहे हे एकदा पाहून भारी वाटलं. या महिलांना योग्य प्लॅटफॉर्म मिळाले तर गावातील टॅलेंट जगभर झळकू शकते. आज सोशल मीडिया म्हणजे फक्त मनोरंजनासाठी नाहीतर आपली कला सादर करण्यासाठी देखील चांगलं व्यासपीठ आहे. कोणाचा आयुष्य बदलून टाकण्या इतकी ताकद या सोशल मीडियामध्ये आहे. या व्हिडिओतून एक गोष्ट नक्की समजते की टॅलेंट दाखवण्यासाठी मोठे शहर किंवा चमकदार स्टेज लागत नाही. लागते ती फक्त हौस एवढा असेल तर तुम्ही अंगणातून देखील पूर्ण जगासमोर तुमचे टॅलेंट दाखवू शकता.