Viral Dance Video: मराठी रंगभूमी टेलिव्हिजन आणि चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. महाराष्ट्राची हास्य जत्रा मधल्या लॉली या तिच्या खास भूमिकेमुळे ती प्रत्येक घराघरात पोहोचली आहे. पण पडद्यामागच्या तिच्या वैयक्तिक आयुष्यातील नम्रता ही एक खूप चांगली आई, चांगली पत्नी आणि मैत्रीण म्हणून अनेकांना भावते. 29 ऑगस्ट रोजी नम्रताचा वाढदिवस साजरा झाला या दिवशी तिने केवळ कुटुंबाबरोबरच नाही तर हास्य जत्रेतील कलाकारांसोबतही वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या पार्टीमध्ये गप्पा हास्य आणि गाण्यासोबत डान्सही जोरात रंगला. यावेळी नम्रता ने साडी नेसून ऋतिक रोशन च्या गाजलेल्या सेनोरिटा या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. तिच्या या जबरदस्त नृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या संपूर्ण क्षणाला आणखीन खास बनवलं ते तिच्या लहान मुलाने. नम्रताच्या मुलाने म्हणजे रुद्राने त्याच्या आईचा डान्स सुरू असताना मोबाईल हातात घेतला आणि मोठ्या कौतुकाने तिचा व्हिडिओ शूट केला. फक्त सहा वर्षाचा असलेला हा चिमुकला नेहमीच आपल्या आईबद्दल अभिमानाने बोलताना दिसतो. काही काळापूर्वी नम्रता शूटिंगमध्ये व्यस्त असताना रुद्राज आणि त्याच्या वडिलांनी तिच्या वतीने एक पुस्तक स्वीकारलं होतं. त्यानंतर आता वाढदिवसाच्या दिवशी आईला रंगमंचावर डान्स करताना पाहून त्यांनी हा क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपला आहे. Viral Dance Video
हे पण वाचा| शिक्षिकेचा विद्यार्थिनींसह ‘घर मोरे परदेसिया’, गाण्यावर हटके डान्स! VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक..
हा व्हिडिओ अभिनेत्री वनिता खरात येणे आपल्या इंस्टाग्राम वर शेअर केला त्यानंतर सोशल मीडियावर हा चांगलाच व्हायरल झाला आहे. प्रेक्षकांनी नम्रताचा हा मनापासून केलेला डान्स आणि मुलाचे तिच्याबद्दलचे प्रेम पाहून भरभरून कौतुक केले आहे. आज अभिनयाच्या व्यासपीठावर चमकणारी नम्रता एका आईच्या रूपातही तितकीच प्रेरणादायी ठरत आहे. कारण तिच्या यशामागे कुटुंबाचा आधार आणि मुलांच्या डोळ्यातील तो निखळता अभिमान दिसतो. रुद्राज सारखा गोड चाहता आणि आधार देणारे पती सोबत असताना नम्रता अजून कितीतरी उंच शिखरे गाठू शकते यात काही शंका नाही.

1 thought on “Senorita…! नम्रता संभेरावचा भन्नाट डान्स! चिमुकल्या रुद्राजला आईचं कौतुक करतात सगळ्यांचं मन जिंकलं, पाहा Cute व्हिडीओ”