Viral Video: बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील राक्षस भुवन तांबा येथील खोलेवाडी परिसरात काल एक थरारक घटना घडली. या भागातील एका शेतकऱ्यांच्या विहिरीत एक बिबट्याचे पिल्लू चुकून पडलं. बिबट्या म्हटलं तरी या भागातील सर्व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पाण्याने भरलेल्या विहिरीत तडफडणाऱ्या त्या पील्ला कडे पाहून त्या भागातील गावकऱ्यांनी वन विभागास संपर्क केला.
त्या बिबट्याच्या पिलाचा गुरगुरणारा आवाज प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण करत होता. पण बिबट्या म्हटलं की सर्व लोक भीतीने घाबरू लागले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही त्या बिबट्याला विहिरीतून काढणे अशक्य वाटू लागले. मात्र या बचाव मोहिमेत सर्पज्ञानी प्रकल्पाचे सिद्धार्थ सोनवणे यांनी सर्वात मोठा पुढाकार घेतला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या वन्यप्राण्याला वाचवण्याचा त्यांचा निर्धार पाहून गावकरी थक्क झाले.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
घटनास्थळी वन विभागाचे काही अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर परिसरातील अनेक नागरिक देखील हा सर्व प्रकार बघण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. मात्र प्रत्यक्षात पिल्लाला विहिरीतून बाहेर काढण्याचं कसब आणि साहस फक्त सिद्धार्थ सोनवणे यांनी दाखवलं. त्यांनी एका बोंदरीच्या साह्याने त्या पिल्लाला खोल विहिरीतून वर काढले, आणि सुरक्षित पिंजऱ्यामध्ये टाकले. Viral Video
खोल विहिरीतून बिबट्याच्या पिल्लाला वर ओढणे खूपच धोकेदायक होते. कारण त्याची चपळाई आणि हालचाल अंगावर काटा आणणारी होती. पण शेवटी खूप प्रयत्नानंतर बिबट्याचे पिल्लू बाहेर काढून पिंजऱ्यात सुरक्षित टाकण्यात आले. सोशल मीडियावर या बचाव मोहिमेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये विहिरीत तडफड करणारा बिबट्या, घाबरलेली गावकरी आणि सिद्धार्थ सोनवणे यांचे धाडस स्पष्ट दिसत आहे.
हा व्हिडिओ पाहून अनेक जणांनी सोशल मीडियावर वनविभागाच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. वन अधिकारी आणि वनरक्षक हे केवळ नावालाच आहेत का? असा थेट सवाल लोकांनी विचारला आहे. अनेकांच्या मते, सिद्धार्थ सोनवणे यांचे धाडस नसते तर या बिबट्याच्या पिल्लाचा जीव वाचलाच नसता. ही घटना वन्यजीव संरक्षण आणि त्यासाठी काम करणाऱ्या खऱ्या निसर्गप्रेमी ची गरज पुन्हा अधोरेखित करते.
