Viral Video: आजच्या काळात सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचेच नव्हे तर रोज नवनवीन चर्चांना तोंड देणार व्यासपीठ तयार झाला आहे. दररोज हजारो व्हिडिओ अपलोड होतात आणि त्यापैकी काही क्षणाभरात चर्चेचा विषय बनतात. काही हसवणारे असतात तर काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे देखील असतात. अशातच एक भांडणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. एका शेतातील दोन महिलांच्या तुडुंब मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी इतके हसले की त्यांनी थेट याला थेट पानिपतचे तिसरे युद्ध असं टॅगलाईन घोषित केले.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एखाद्या किरकोळ कारणावरून दोन महिला शेतात एकमेकीवर तुटून पडल्या आहेत. दोघी एकमेकाचा पाय ओढतात आणि एकमेकीला खाली पाडतात जमिनीवर पडल्यावर देखील त्या हार न मानता पुन्हा उभ्या राहून पुन्हा भिडायला लागतात. सगळ्यात गंमत म्हणजे भांडण थांबवण्यासाठी तिथे उभा असलेला माणूस पुढे येऊन भांडण मिटवण्याऐवजी मोबाईलचा कॅमेरा चालू करून व्हिडिओ शूट करत बसला आहे. त्यामुळे हे प्रकरण थेट सोशल मीडियावर पोहोचलं आणि क्षणातच व्हायरल झाला आहे.
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
हा व्हिडिओ एक्स वर शेअर करण्यात आला असून काही क्षणातच हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्येच पानिपतचे तिसरे महायुद्ध असे लिहिले आहे. हे वाचूनच लोक मोठमोठ्याने हसू लागले. या व्हिडिओला अनेक युजरने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे ही लढाई तर स्फोटक आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे. यावर आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने हस्तक्षेप करायला हवा. तर आणखीन एका युजरने लिहिले आहे. भरीत दमदार भांडत आहे. Viral Video
हे पण वाचा| वडील मिठाई घ्यायला गेले अन् चिमुकली गाडीत लॉक; मोबाईलमुळे झाली सुटका; VIDEO एकदा पहाच
व्हायरल व्हिडिओ मधील भांडणाचे कारण काय
या व्हिडिओत नेमकं कशावरून वाद होत होता हे कोणालाच कळलं नाही. पण दोन महिलांची ही झुंज आजूबाजूची ग्रामीण पार्श्वभूमी आणि त्याला दिलेले मजेशीर कॅप्सन यामुळे झपाट्याने व्हायरल झाले आहे. लोक सोशल मीडियावर केवळ गंभीर किंवा माहितीपूर्ण कंटेंट बघतात असं नाही तर अशा हलक्या फुलक्या आणि थोड्या गमतीशीर प्रसंगावरही लोकांना खूप आनंद मिळतो. आजकालच्या गडबडीत लोकांना सोशल मीडियावर असा एखादा व्हिडिओ मिळाला की ते असून घेतात. मन हलकं होतं या दोन महिलांमधील भांडणाचा खरं कारण काय आहे कोणालाही माहीत नाही पण या गमतीशीर भांडणामुळे अनेक जण आपला सर्व ताण विसरून हसू लागले.

2 thoughts on “Viral Video: शेतात दोन महिलांमध्ये जबरदस्त हाणामारी, व्हायरल व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; व्हिडिओ इथं पहा”