Viral Video: साप हा अतिशय विषारी प्राणी असल्यामुळे सापाचं नाव जरी ऐकलं तरी अंगावर काटा येतो. त्यामध्ये कोब्रा साप हा सर्वात विषारी मानला जातो. त्याचा दोष म्हणजे सरळ मृत्यूला निमंत्रण देणं असंच आहे. सापाचा दोष झाल्यावर तात्काळ योग्य वैद्यकीय उपचार घेणे खूप महत्त्वाचे असते. जर उपचार घेण्यास उशीर झाला तर व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो. मात्र आजच्या आधुनिक काळातही काही ठिकाणी लोक अजूनही भोंदू बाबाच्या जाळ्यात अडकलेले आहेत. असाच धक्कादायक व्हिडिओ बिहार मधून समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये जे घडलं ते हादरवून टाकणार आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
बिहार मधील सीतामढी जिल्ह्यातील एका महिलेला सापाने दंश केला. या गंभीर प्रसंगात गावकऱ्यांनी तिला जवळील रुग्णालयात न नेता थेट गावातील भोंदू बाबा कडे घेऊन गेले. कारण गावकऱ्यांना असं वाटतं की भोंदू बाबा तिच्या अंगातून विष बाहेर काढू शकतो. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांना अशा अंधश्रद्धेवर संताप व्यक्त केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला जमिनीवर पडलेली दिसते. त्या महिलाच्या आजूबाजूला बरेच लोक जमलेले आहेत. Viral Video
या महिलेला कोब्रा सापाने दंश केला असल्याचे समोर आले आहे. त्या महिलाला रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी त्या भोंदू बाबाकडे नेण्यात आले आहे. भोंदू बाबा काही विचित्र विधी करताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर एका पुरुषाने काठी घेऊन तिच्या अंगावर वाजत असल्याचे देखील दिसत आहे. काही लोकांचा विश्वास होता की या पद्धतीने साफ परत विष शोषून घेईल. मात्र हे सगळं फक्त अंधविश्वास आहे. विषारी साप चावल्यानंतर त्या व्यक्तीवर रुग्णालयात योग्य तो उपचार केला जातो. त्यामुळे कोणीही अशा प्रकारे आपला वेळ वाया न घालता लगेच जवळील रुग्णालयात दाखल होणे गरजेचे आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
वैद्यकीय शास्त्र असे सांगते की, सर्पदंशानंतर एक क्षणही न वाया लावता रुग्णालयात जाणे आवश्यक आहे. प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. मात्र अशा अंधश्रद्धेमुळे अनेकांचे जीव धोक्यात येतात. बिहारमधील या घटनेचा ही गावकऱ्यांचा अंधविश्वास पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. काहींनी सोशल मीडियावर कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटलं आहे, आजही लोक डॉक्टरकडे न जाता भोंदू बाबाच्या नादी लागतात त्यामुळे अशा घटना घडत राहतात.
हे पण वाचा| फक्त दोन सेकंदाचा काकूंचा धमाकेदार डान्स व्हायरल; पाहणाऱ्यांनी केलं भरभरून कौतुक..
सर्पदंश झाल्यानंतर काय करावे?
जर तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूला कोणालाही सर्पदंश झाल्यावर घाबरून जाऊ नका. लवकरात लवकर जवळील शासकीय रुग्णालयात दाखल व्हा. लक्षात ठेवा साप चावल्यानंतर एकमेव सुरक्षित उपाय म्हणजे तात्काळ रुग्णालयात जाणे.
- जखमी व्यक्तीला शांत ठेवा आणि हालचाल करू देऊ नका.
- ज्या ठिकाणी सापाने चावला आहे तो भाग साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा.
- स्वच्छ कपड्याने जखम झाका.
- बर्फ औषधी वनस्पती किंवा स्थानिक उपचार करू नका.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे लगेच जवळील रुग्णालयात दाखल व्हा.

1 thought on “महिलेला साप चावल्यावर गावकऱ्यांनी रुग्णालयात नेण्याऐवजी भोंदूबाबाकडं नेलं; पुढं जे घडलं ते भयंकर, पाहा व्हिडिओ..”