Viral Video: या सोशल मीडियाच्या जीवनात रोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र हा व्हायरल व्हिडिओ भावनिक करणार आहे. यामध्ये एका मुक्या प्राण्याचे त्याच्या मालका वरील प्रेम स्पष्ट दिसत आहे. सध्या महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस झाल्यामुळे नदी नाल्यांना मोठे पूर आले आहेत. या पुरामध्ये अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुकी जनवारे पाण्यात वाहून गेले आहेत. हा प्रसंग देखील पुराच्या पाण्या वेळी घडलेला आहे. घरातील कुत्रा मांजर म्हैस बैल हे पाळीव प्राणी आपण त्यांना जेवढा जीव लावू तेवढाच तेही आपल्यावर जीव लावतात. आपल्यापेक्षाही त्या प्राण्यांचा आपल्यावर जास्त विश्वास असतो.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अनेक वेळा हे पाळीव प्राणी आपल्या मालकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत देखील करतात. या लाडक्या पाळीव प्राण्यांना घरातील एखाद्या सदस्य प्रमाणेच प्रेम माया दिली जाते. अशा अनेक पाळीव प्राण्यांचे व्हिडिओ आपण आजपर्यंत पाहिले असतील. मात्र शेतकऱ्याच्या या वाघाचा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील भावनिक होऊन रडू लागतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मालक आणि त्याच्या बैला मधील प्रेम पहायला मिळत आहे. (Viral video of the flood) Viral Video
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सध्या राज्यात जोरदार पाऊस होत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक गोरगरीब नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. अशातच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात एका नदीला महापूर आला आहे. पुराच्या पाण्यातून मालक नदीच्या दुसऱ्या काठावर येतो परंतु यावेळी त्याचा एक बैल नदीच्या पलीकडे राहतो. बैल पुराच्या पलीकडे राहिलेले पाहून मालक बैलाला आवाज देतो. मालकाचा आवाज ऐकून बैल पुराच्या पाण्यात उडी घेतो आणि पोहत नदीच्या दुसऱ्या काठावर पर्यंत पोहोचतो. यामध्ये नदीच्या पाण्याचा वेग वाढल्यामुळे बैल वाहून जाणार नाही ना अशी भीती मालकाच्या मनात निर्माण होते. त्यामुळे मालक देखील बैलाच्या प्रेमापोटी पाण्यात उडी मारून पुढे जातो. शेतकरी मालक आणि बैला मधील हे प्रेम पाहून नेटकरी भावनिक झाले आहेत.
हे पण वाचा| शेतात दोन महिलांमध्ये जबरदस्त हाणामारी, व्हायरल व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; व्हिडिओ इथं पहा
व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओला अगदी काही वेळेतच अनेक लाइक्स आणि व्ह्यूज मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर यावर कमेंट करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेक लोक भावनिक झाले आहेत. एका युजरने लिहिले आहे की, म्हणूनच तर याला शेतकऱ्यांचा राजा म्हणतात. तर दुसऱ्या एका युजरने लिहिली आहे हा खरा शेतकऱ्याचा वाघ आहे. अनेक युजर अक्षरशा रडले आहेत. तर एका युजरने लिहिले आहे या भावना फक्त शेतकऱ्याचे लेकरूच समजू शकतं.
