Viral Video: सोशल मीडियावर आजकाल अनेक वेगवेगळी व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एखाद्या साध्या व्यक्तीचा व्हिडिओ सुद्धा एका रात्रीत लाखो व्ह्यूज मिळू शकतो. आधी लोकांना आपली कला दाखवण्यासाठी मंच लागत असे पण आता प्रत्येकाच्या मोबाईल मध्येच सोशल मीडियाचे जबरदस्त मंच निर्माण झाले आहे. तुम्ही तुमच्या घरात बसल्या बसल्या एखादा डान्स व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड करून कलाकार बनू शकता. असाच एक जबरदस्त डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये एक साधी महिला एका कार्यक्रमात गाण्यावर थिरकताना दिसत आहे. त्या काकूच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि हावभाव पाहून प्रत्येक जण कौतुक करत आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
काकूंचा भन्नाट डान्स
या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, घरगुती वातावरणात बसलेल्या महिलांमध्ये अचानक काकू उठतात आणि एका गाण्यावर जबरदस्त डान्स करतात. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे निरागस हसू, हलकेच बोलणाऱ्या हालचाली आणि मनापासून केलेल्या डान्स स्टेप पाहून आसपासच्या महिला खुश होऊन टाळ्या वाजू लागल्या. काकूंचा जबरदस्त डान्स इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या डान्स व्हिडिओला सात लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाल्या असून हजारो लोकांनी आपल्या लाईक्स आणि प्रतिक्रिया स्वरूपात कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी कमेंट मध्ये आपले प्रेम व्यक्त केले आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लोकांच्या प्रतिक्रिया
एका युजरने कमेंट मध्ये लिहिले आहे खूप सुंदर डान्स आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे तुमचा नादच खुळा डान्स, तर तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे किती सुंदर डान्स करता तुम्ही काकू. आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात घरकाम नोकरी मुलं या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडून महिला स्वतःला वेळ खूप कमी देतात. पण त्यांच्यातील ती मुलगी ती कलाकार अजूनही जिवंत असते. फक्त तिला व्यक्त होण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. या काकूंनी दोन सेकंदाचा डान्स केला खरा पण त्यात त्यांनी केवळ स्वतःच नाही तर प्रत्येक महिलाच स्वप्न जगासमोर ठेवलं. Viral Video
हे पण वाचा| Senorita…! नम्रता संभेरावचा भन्नाट डान्स! चिमुकल्या रुद्राजला आईचं कौतुक करतात सगळ्यांचं मन जिंकलं, पाहा Cute व्हिडीओ
आज सोशल मीडिया फक्त करवणुकीसाठी राहिले नसून साध्यासुध्या माणसाला आपली कला मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळाला आहे. एखादा व्हिडिओ तुमचा आयुष्य बदलू शकतो. अनेक लोक ओळखू लागतात कौतुक करू लागतात. त्याहून महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या मनातील दडलेली कला पुन्हा एकदा लोकांसमोर दाखवू शकतात. या काकूंचा डान्स आपल्याला हेच शिकवतो की आनंद व्यक्त करण्यासाठी मोठे स्टेज मागडे कपडे किंवा खास प्रशिक्षण घेणे महत्त्वाचे नाही. थोडा आत्मविश्वास मनापासून केलेली हालचाल आणि चेहऱ्यावर असणारे हास्य एवढेच पुरेसे आहे.