Viral Video: आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल असतो आणि हा मोबाईल फक्त खेळण्यापुरता मर्यादित नसून यातून खूप काही शिकायला देखील मिळतं. अनेकदा तो जीव वाचवणारा देखील ठरू शकतो. यातच एक भावनिक उदाहरण तेलंगणातून समोर आला आहे. पेंडापल्ली जिल्ह्यातून एका गावात मिठाईच्या दुकानाबाहेर ही घटना घडली आहे. वडील गाडीतून उतरून मिठाई आणण्यासाठी दुकानात गेले आणि नकळत कारचा दरवाजा लॉक झाला. आत मध्ये त्यांची लहानशी मुलगी एकटीच अडकली. गाडीच्या चाव्या सुद्धा आत राहिल्यामुळे गाडीच्या आत मधली मुलगी रडायला लागली. बाहेर उभे असलेले नागरिक हतबल झाले होते काय करावे काहीच कळेना सर्वांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती.
प्रत्येकाने आपापल्या परीने गाडीचा दरवाजा उघडवण्याचा प्रयत्न केला. पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी एका तरुणाने जबरदस्त कल्पना सुचवली. त्याने आपल्या मोबाईलवर कार अतुल कशी अनलॉक करायची याचा व्हिडिओ सुरू केला. तो व्हिडिओ छोट्या मुलीला कारच्या काचेतून दाखवला. मोबाईल मध्ये दाखवलेल्या स्टेप त्या चिमुकलीने आहे तसे कॉपी केल्या. सर्वांच्या धडधडलेल्या श्वासामध्ये एकदम आनंद पसरला, कारण काही क्षणातच त्या चीमुकलीने गाडीचा दरवाजा व्हिडिओमध्ये पाहून आहे तसा अनलॉक करून उघडला.
हे पण वाचा| अजगराने व्यक्तीला विळख्यात घट्ट पकडलं अन् नंतर पुढे घडलं ते पाहून अंगावर काटा येईल; VIDEO पाहून फुटेल घाम
काही वेळापूर्वी त्या चीमुकलीचा जीव धोक्यात असल्यासारखा वाटत होतं पण लॉक उघडताच लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. मुलगी सुखरूप बाहेर आली आणि धावत तिच्या वडिलांच्या मिठीत शिरली. त्या क्षणी उपस्थित सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्या मुलींचे कौतुक केले. या सर्व घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक जणांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका नेटकऱ्याने अगदी अचूक कमेंट केली आहे. फोनवर बंदी घालण्यापेक्षा मुलांना योग्य वापराबद्दल शिकवा कारण आपत्कालीन प्रसंगी तोच तुमचा जीव वाचू शकतो. Viral Video
मोबाईल मुळे अनेक दुष्परिणाम होतात पण त्याचा सदुपयोग केला तर नक्कीच तो तुमच्या यशाचे कारण देखील बनू शकतो. अनेक वेळा कठीण प्रसंग निर्माण होतात पण त्या प्रसंगातून बाहेर निघण्यासाठी मोबाईल महत्त्वाची भूमिका बजावतो. मोबाईलचे दुष्परिणाम देखील खूप आहेत पण त्याचा योग्य वापर करून चांगले शिकणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण चिमुकलीचे धाडस आणि तिच्या बाबांनी दिलेला दिलासा पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी नक्की येईल.
1 thought on “वडील मिठाई घ्यायला गेले अन् चिमुकली गाडीत लॉक; मोबाईलमुळे झाली सुटका; VIDEO एकदा पहाच”