बापरे! आत्महत्या करणाऱ्या तरुणीला मृत्यूच्या तावडीतून वाचवलं; VIDEO पाहून अंगावर शहारे उभे राहतील..


Viral Video: आजकालच्या तरुण मुलं-मुली आपलं अनमोल आयुष्य चिल्लर कारणांमुळे वाया घालतात.  जीवन जगण्यासाठी अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. यामध्ये सर्वात महत्त्वाचे ठरते ते मानसिक प्रबळता. जर तुम्ही मनाने प्रबळ असतात तर तुम्ही कोणत्याही संकटांना सामोरे जाऊ शकता. आपण अनेक बातम्या ऐकतो यामध्ये प्रेम प्रकरण असो किंवा घरातील भांडण असो किंवा आर्थिक ओढाताण असो हे सगळं मनावर एवढं जड होतं की आजकालची तरुण मुलं-मुली आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतात. पण प्रत्येक वेळी मृत्यू दारात उभा असताना कुणीतरी मदतीचा हात पुढे करतो. अशीच हृदयाला स्पर्श करणारी घटना छत्तीसगड बिलासपूर मध्ये घडली आहे.

एक तरुण मुलगी अर्पा नदीच्या पुलावर उभा राहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. त्या मुलीने उडी मारून स्वतःचा जीव देण्याची तयारी केली होती. पण काळाला काहीतरी वेगळंच घडवायचं होतं. त्या बिकट क्षणी एक वाटसरू धाडसाने पुढे आला आणि त्या तरुणीचा हात धरून तिला सुरक्षित बाजूला खेचले. या घटनेचा आश्चर्य जनक व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी त्या मुलाने केलेले चातुर्य आणि हुशारी जे पाहून प्रत्येक जण त्या तरुणांचे कौतुक करत आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या घटनेचा व्हिडिओ पाहिला की अंगावर शहारे उभे राहतात. तरुणी पुलाच्या रेलिंगवर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि मनात राग स्पष्ट दिसत होता. ती स्वतःचा जीव संपवण्यासाठी त्या पुलावरून उडी मारणार होती. पण त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने तिच्यासोबत संवाद साधून तिला नकळत पकडलं आणि बाजूला खेचलं. जर यामध्ये क्षणभर वेळ चुकला असता तर मोठा अनर्थ घडलं असतं. Viral Video

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

ती तरुणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का करत होती याची माहिती अजून समोर आली नाही. मात्र सोशल मीडियावर असा अंदाज वर्तवला जात आहे की तिचे प्रियकराशी भांडण झाले होतं आणि त्याच्या रागातून तिने स्वतःचा जीव संपवण्याचा अगदी टोकाचा निर्णय घेतला. मात्र अजूनही खरं कारण काय असेल यावर स्पष्टता समोर आली नाही. या व्हिडिओला अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये अनेक लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आल्या आहेत.

हे पण वाचा| शेतात दोन महिलांमध्ये जबरदस्त हाणामारी, व्हायरल व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; व्हिडिओ इथं पहा

हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एका युजरने लिहिले आहे. काय एवढं झालं असेल की त्या मुलीला आपला जीव द्यावासा वाटला?, तर दुसऱ्या एका युजरने नाराजी व्यक्त करत म्हटले आहे. हे लोक मरायच्या आधी घरच्यांचा विचार करत नाहीत. तर कुणी शांतपणे लिहिले आहे ज्याचं दुख ज्याला त्यालाच माहीत असतं.

या संपूर्ण घटनेतून एक गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे, समाजात अजूनही माणुसकी जिवंत आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी वाटसरूणे दाखवलेले धाडस खरंच कौतुक करण्यासारखे आहे. जीवाच्या आकांतात माणसाने एकमेकांना साथ द्यायला हवी. खरी मानवता यामध्येच असते. त्याचबरोबर आजकालच्या तरुणांनी रागावर संयमाने काम घ्यावे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आत्महत्या हेच नसते. आयुष्यात कितीही वाईट गोष्टी घडल्या तरी त्यावर तोडगा शोधता येतो. एका क्षणाच्या चुकीच्या निर्णयामुळे आपले कुटुंब आणि आपल्या आयुष्य खराब होऊ शकते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “बापरे! आत्महत्या करणाऱ्या तरुणीला मृत्यूच्या तावडीतून वाचवलं; VIDEO पाहून अंगावर शहारे उभे राहतील..”

Leave a Comment

error: Content is protected !!