Viral Video: मनोरंजन जगात सोशल मीडियामुळे दररोज कोणाचा ना कोणाचा व्हिडिओ व्हायरल होत असतो. मात्र सध्या असा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री नारायणी शास्त्री आपले रूप बदलून वेगळ्याच देशात दिसली आहे. चष्मा डोळ्यावर चेहऱ्यावर वाढलेली दाढी आणि हातात डफली घेऊन नारायणी रस्त्याच्या कडेला गाणं गाताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर ती स्वतः गाणं म्हणून भीक मागताना देखील पाहायला मिळाली आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
हा व्हिडिओ पाहून अनेक जणांना आश्चर्याचा धक्का बसला. इतकी प्रसिद्ध अभिनेत्री आणि अशी अवस्था कशी काय झाली असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण काही क्षणात व्हिडिओचं खरं सत्य समोर आले आहे. खरंतर नारायणी शास्त्री ही सध्या एक हिंदी मालिकेत काम करत आहे. त्या मालिकेच्या स्टेजवर असतीने हा मजेशीर व्हिडिओ शूट केला होता. गमतीशीर पद्धतीने तयार केलेल्या या व्हिडिओला तिने सोशल मीडियावर शेअर केलं आणि हा व्हिडिओ काही वेळातच प्रचंड व्हायरल झाला.
नारायणीने व्हिडिओ सोबत लिहिलेले कॅप्टन नीट करण्याचं लक्ष वेधून घेत आहे. मी माझा व्यवसाय कधीही बदलू शकते आणि त्यात गांभीर्याने दुसरं काहीतरी करू शकते. म्हणूनच मला अभिनय क्षेत्र आवडतं. तुम्ही एका झटक्यात अनेक गोष्टी करू शकता. असं तिने म्हटलं आहे. नारायणी शास्त्रीचं नाव घेतलं की अनेकांना पक पक पकाक या सिनेमातील साळूची आठवण होते. तिच्या त्या हटके भूमिकेमुळे ती प्रेक्षकाच्या मनात कायमच राज्य करत आहे. त्यानंतर तिने अनेक हिंदी मालिकेमध्ये मोठं नाव कमावलं.
हे पण वाचा| महिलेला साप चावल्यावर गावकऱ्यांनी रुग्णालयात नेण्याऐवजी भोंदूबाबाकडं नेलं; पुढं जे घडलं ते भयंकर, पाहा व्हिडिओ..
आजही नारायणी तिच्या दमदार अभिनयामुळे चाहत्यांच्या मनात घर करून बसली आहे. मात्र तिच्या या अनोख्या व्हिडिओने तिच्या चाहत्यांना काही क्षण धक्काच दिला. पण त्याचवेळी तिच्या विनोदी बुद्धीचे कौतुकही केले जात आहे. अभिनयाच्या बरोबरीने प्रेक्षकांना हसवण आणि विचार करायला लावणे हेही नारायणीला उत्तम करता येते. हे या व्हिडिओ मधून स्पष्टपणे समोर आले आहे. Viral Video