Weather Alert | आज भारतीय हवामान खातेने दिलेल्या पुन्हा एकदा ताज्या अपडेट नुसार, राज्यात नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. राज्यात आज 29 ऑगस्ट पासून मुसळधार पावसाची सावध असल्याचे स्पष्ट झालेल आहे. यामध्ये कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या भागात जोरदार पाऊस पडणार आहे. या पार्श्वभूमी वरती हवामान खात्याने राज्यातील एकूण 28 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, तर घाटमाथ्यावर काही जिल्ह्यांना थेट ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आलेला आहे. म्हणजे मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा धोका, त्यामध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा फटका बसू शकते.
मुंबई, ठाणे आणि पालघरच्या दिशेने नजर टाकली तर लोकांच्या अपेक्षाप्रमाणे पाऊस हलके ते मध्यम स्वरूपाचा आहे. पण हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्ट्याच्या जिल्ह्यांमध्ये मात्र परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. कारण मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सागर काठच्या गावातील मच्छीमाऱ्यांनी आज बोटीबाहेर काड्याच्या की नाही हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे.
पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिलं तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या पाच जिल्ह्यात आज रात्रीपासून पावसाचा जोर वाढू लागलेला आहे. विशेषता घाटमाथ्या भागात चित्र थोडेसे धोक्याच निर्माण झाला आहे. हवामान विभागाने ते थेट ऑरेंज अलर्ट (Orange Alert) दिलेला आहे. पुण्याच्या मुळशी तामिनी घाटात साताऱ्याच्या महाबळेश्वर पंचगणी परिसरात आणि कोल्हापूरच्या अंबा घाटावर मुसळधार सरी कोसळणार आहेत.
मराठवाड्याचे चित्र काही असेच आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड येथे वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये थोडा हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित असला तरी लोकांनी सावध रहाणे गरजेचे आहे. या भागात अनुभव सांगतो विजांचा कडकडाटात अचानक तीव्र होतो आणि पाऊस एका क्षणात मुसळधार होतो.
उत्तर महाराष्ट्र धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विशेषता नाशिकच्या त्र्यंबक दिंडोरी घाटमाता परिसरात मुसळधार सरी कोसळतील असं हवामान विभागाने म्हटल आहे. तिथल्या द्राक्ष बागातदार शेतकऱ्यांना आता काळजी लागली आहे, कारण पावसाचं प्रमाण वाढलं तर द्राक्षाच्या वेलीवर रोगराई पसरण्याचा धोका आहे.
विदर्भ बाबत बोलायचं झाल्यास, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांना थेट मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या सगळ्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. नागपूर मध्ये तापमानाचा पारा अजूनही जास्त असल्याने नागरिकांना वाटलं होतं की ऊन कडाडतील, पण हवामान विभागाने सांगितले कधीही आबा दाटून पावसाचा फटका बसू शकतो.
हवामान विभागाच्या तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालचे उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम थेट महाराष्ट्रावरती जाणवतोय. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी हा दिलासा आहे, कारण खरीप पिकांना आता योग्य वेळी पाणी मिळणार आहे. पण त्याच वेळी धरण भरू लागल्याने, नदी नाले भरू लागल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.