Weather Alert | राज्यातील वातावरणात मोठा बदल; या 25 जिल्ह्यांना हायलर्ट वाचा सविस्तर माहिती


Weather Alert | काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने जोर पकडलेला आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाने राज्यात विश्रांती घेतली होती पुन्हा एकदा हवामान खात्याने दिलेल्या ताजा अपडेट नुसार 3 सप्टेंबर रोजी कोकण, घाटमाथा, मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांना येलो अलर्ट तर आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. पुढचे चार दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.Weather Alert

कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

हवामान खात्याच्या ताजा अपडेट नुसार, पालघर, ठाणे, मुंबई या भागामध्ये वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे या तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अतिवृष्टीचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. किनारपट्टीवरील गावांमध्ये मच्छीमारांना समुद्रात जाण्याचा सल्ला हवामान खात्याने दिलेला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात घाठमाथ्यावर धोका

हवामान खात्याने कोकणासह पश्चिम महाराष्ट्र देखील मोठा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. पुणे, सातारा, आणि कोल्हापूर घाटमाथ यामध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. असल्याने या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेले आहे तर सांगली, सोलापूर सह इतर जिल्ह्यांमध्ये मध्यम सरींचा अंदाज आहे.

मराठवाड्यात विजांचा कडकडाट

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर दिसणार आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळीवारासह सर्व जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

उत्तर महाराष्ट्रात परिस्थिती काय?

धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पाऊस पडणार आहे. नाशिकच्या घाटमाथ्यावरती मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने येथे सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. जळगाव जिल्ह्यात मात्र परिस्थिती अधिक गंभीर असून तिथे मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. तर बुलढाणा, गोंदिया, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात वादळीवारासह पावस होईल. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. अमरावती जिल्ह्यासाठी मात्र हवामाना विभागान ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!