Weather Alert  : राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा मोठा इशारा या 15 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा


Weather Alert  | राज्याच्या हवामानात पुन्हा एकदा बदल झालेला आहे आणि अशातच हवामान खात्याने एक मोठा इशारा दिलेला आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी म्हणजे शुक्रवारी राज्य काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.  कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवरती परिस्थिती जास्त गंभीर होऊ शकते, असं स्पष्टपणे सांगण्यात आले. यामुळे अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. Weather Alert

कोकण पावसाचा तडका

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पालघर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागांना ऑरेंज अलर्ट दिला गेला. मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये जोरदार पाऊस होणार असून येलो अलर्ट लागू करण्यात आलाय. आधीच मुंबई कोकण रेल्वे प्रवासात उशीर, आणि रस्त्यावर पाणी साचणं झाडं कोसळण अशी परिस्थिती वारंवार होते. त्यामुळे प्रशासनाने लोकांना आनवश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले.

पश्चिम महाराष्ट्रात देखील मोठा धोका वर्तवण्यात आलेला आहे. Pune, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाचा मध्यम स्वरूपाचा इशारा असला तरी घाटमाथ्यावर मात्र स्थिती चिंतेची ठरणारी आहे. पुणे घाट माथ्यावरती अति मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाट भागामध्ये येलो अलर्ट आहे. या भागात दरडी कोसळण्याचा धोका असल्याने नागरिकांना खबरदारी घेण्याच्या आव्हान करण्यात आल आहे.

मराठवाडा मध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. त्यामुळे तिथे येलो अलर्ट देण्यात आलाय. परभणी, बीड, नांदेड, हिंगोली, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांना वीज कडाडत असताना शेतात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय.

उत्तर महाराष्ट्रात म्हणजे धुळे जळगाव नाशिक या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार असून इथे येलो अलर्ट देण्यात आलाय.  तर नंदुरबार आणि नाशिक घाटमाथ्यावर अटी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यावेळी विदर्भात मात्र पावसाची शक्यता नाही. अकोला, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम आणि गोंदिया या जिल्ह्यात फक्त ढगाळ वातावरण राहील.

हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज; अति मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज

Leave a Comment

error: Content is protected !!