Weather Alert : राज्यामध्ये पावसाचा जोर वाढत चाललेला आहे. हवामान खात्याने येत्या शनिवारी 19 जुलै रोजी काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाटात आणि वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे हा भारतीय हवामान खात्याचा अंदाज शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे तसेच पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असून राज्यातील काही 11 जिल्ह्यांना थेट इलो अलर्ट दिलेला आहे यामुळे शेतकरी बांधवांनी या हवामान अंदाज कडे लक्ष द्या. Weather Alert
सध्या राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बदलत चाललेली आहे. अचानक कुठेही ढगाळ वातावरण निर्माण होतं. आणि तुफान पाऊस पडतो. तर काही जिल्ह्यात सकाळ धरून ऊन पडत आहे. यामुळे शेतकरी बांधव देखील हैराण झालेले आहेत. आज देखील पाऊस पडेल का? का आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार अशा देखील प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटू लागलेले आहेत.
राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई सह काही जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून सिंधुदुर्ग भागामध्ये धो धो पावसाचा अंदाज आहे. या तिन्ही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलेला आहे.
तसेच पुणे आणि पुणे शहरांमध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. परंतु कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि त्यांच्या घाट भागांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पुणे वगळता इतर सर्व जिल्ह्यांना या ठिकाणी येलो अलर्ट दिलेला आहे.
छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. विशेषता लातूर आणि धाराशिव या भागांमध्ये वीज व वाऱ्यांसह पावसाचा तडाका बसण्याची शक्यता आहे, म्हणून या दोन्ही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे.
नाशिक शहरामध्ये हलक्याचे मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तर जळगाव नंदुरबार अहिल्यानगर या भागात कुठेही मध्यम पाऊस पडणार आहे. शेतकऱ्यांनी ग्रामीण भागातील राहणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी. मी पुढील हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करत चला.