Weather Alert : हवामान खात्याचा मोठा इशारा या जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आवाहन वाचा सविस्तर माहिती


Weather Alert : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाला होत. आता याच पार्श्वभूमी वरती पुन्हा एकदा हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे. मध्यंतरी दोन दिवस पावसाची विश्रांती आपल्याला पाहायला मिळाली, परंतु आता पावसाचा जोर कमी होत असतानाच हवामान खात्याने पुन्हा काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. 24 ऑगस्ट रोजी कोकणातील बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. केवळ रायगड जिल्हा मध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. Weather Alert

मुंबई ठाणे

आज मुंबईमध्ये दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता नसल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. तापमान 26 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. ठाणे व नवी मुंबई भागामध्ये दिवसभर आभाळ ढगाळ राहील परंतु काही ठिकाणी रिमझिम पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु यामुळे नागरिकांना कोणताही मोठा त्रास होणार नाही.

पालघर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची तीव्रता कमी राहील दुपारनंतर हलक्या सरी पडू शकतात. तापमान 25 ते 30°c दरम्यान असेल. जास्त आद्रतेमुळे वातावरणात उकडा जाणवणार आहे. समुद्रकिनारी वारा वीस ते पंचवीस किलोमीटर प्रतितास राहील.

फक्त रायगड जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. दिवसभरामध्ये अधून मधून मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. तसेच शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन योगी नियोजन करायचे आहे.

तर दोन दिवस किनारी जिल्ह्यांमध्ये कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही अधून मधून पाऊस पडेल समुद्र शांत असल्याने मच्छीमारांना अडचण नाही. तरीही स्थानिक हवामानांचा अंदाज लक्षात घेऊन पुढचे नियोजन करावे.

(हा हवामान अंदाज प्रसार माध्यमांमध्ये दिलेल्या माहितीनुसार आहे.)

हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज जारी; राज्यात नवीन मोठा इशारा!

Leave a Comment

error: Content is protected !!