Weather forecast : पश्चिम महाराष्ट्रामध्ये उन्हाच्या तीव्र लाटेने आधीच जनजीवन विस्कळीत झाला असताना अचानक आता अवकाळी पावसाचा संकट समोर आलेला आहे. आज 22 एप्रिल 2025 रोजी हवामान खात्याने तीन प्रमुख जिल्ह्यासाठी मोठा इशारा जाहीर केलेला आहे. या पार्श्वभूमी वरती विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये शेतकरी वर्ग, नागरिक आणि स्थानिक प्रशासनाला अतीदक्षतेचा इशारा दिलेला आहे. Weather forecast
सोलापूर जिल्ह्यात तीव्र उष्ण आणि विजांचा इशारा वर्तवला आहे सोलापूर जिल्ह्यात सध्या महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला भाग ठरतोय. आजचा कमाल पारा 42 अंश पुढे गेला आहे. किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतका आहे. मात्र दुपारी आकाश ढगाळ होण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी पीक सुरक्षित ठिकाणी हलवावीत आणि योग्य ते नियोजन करावे.
कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी ची सदी गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात ढगाळ हवामान असल्याने थोडीशी थंडी जाणवत होती. मात्र आता पुन्हा एकदा तापमान वाढत असून आजचा पारा 39 अंस पर्यंत जाईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
सांगली जिल्ह्यात हवामान मोठा बदल झालेला आहे सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 38.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे तर आज तापमान 39 अंशा पर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्यामुळे आघाडीच्या हवामान बदलाकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
पुणे सातारा जिल्ह्यात आता कायम असून पुणे जिल्ह्यात कमाल तापमान 40° च्या आसपास राहील आकाश निरभ्र राहणार आहे. साताऱ्यात देखील 40° चे तापमान नोंद होईल, मात्र पावसाची शक्यता नाही. नागरिकांनी दुपारच्या वेळेस बाहेर जालना टाळावं आणि पुरेसा पाणी प्यावे, असा सल्ला देण्यात आलेला आहे.
या काळजी घेणे आवश्यक
शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवरती उभ्या पिकांचे संरक्षण करणे आवश्यक आहे, पार्श्वभूमी वरती आपल्या पिकाचे योग्य ते नियोजन करा तसेच ज्या पिकांचे हार्वेस्टिंग वगैरे झाली आहे असे पिके ताडपत्री टाकून झाकून ठेवावी. विजांच्या कडकडाटा च्या व्हिडिओ उघड्यावर काम करत असला सुरक्षित ठिकाणी जाणे आवश्यक आहे. नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लोक झाकलेलं ठेवाव, आणि भरपूर पाणी प्यावं. शाळकरी मुले, खुर्द आणि रुग्णांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे.
पश्चिम महाराष्ट्रावरती उष्माच चावट असताना आता अवकाळीचा संकट गडद होत आहे. सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनाकडे लक्ष द्यावे. पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा फटका शेतकऱ्यांना बसु शकतो. त्यामुळे सजग रहा, सुरक्षित रहा!
हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज; अति मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज
1 thought on “आजचा मोठ हवामान अपडेट: भारतीय हवामान खात्याने या जिल्ह्यांना दिला रेड अलर्ट!”