हवामान खात्याचा मोठा अंदाज, राज्यातील या 9 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा


Weather forecast : मागच्या काही दिवसांमध्ये पावसाने चांगल्या प्रकारचा जोर पकडला होता. परंतु आता पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतलेली आहे. आकाशात सूर्य वर डोकावतो, काही ठिकाणी एखाद्या दुसऱ्या सरी पडताना देखील पाहायला मिळत आहे. परंतु जोरदार पाऊस राज्यामध्ये कुठेच आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र आता मंगळवारी हवामानात पुन्हा एकदा बदल झाल्याच हवामान विभागान सांगितलं आहे. याच पार्श्वभूमी वरती नऊ जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे. Weather forecast

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना जोरदार पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या दोन जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे. सदासरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

मुंबई आणि उपनगरामध्ये हलक्या फुलक्या सरी पडताना पाहायला मिळत आहे तर आसपासच्या भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील. अधून मधून हलक्या पुलक्या सरी होतील, पण काही विशेष ठिकाणी शहरा दिलेला नाही. मुंबईकरांना मात्र जोरदार पावसाचे अपेक्षा करत राहावा लागेल.

तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे आणि सातारा घाटमाथ्यावरती येलो अलर्ट दिलेला आहे. ढगांची घनघटा तिथे जमू लागलेले आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर यासारख्या भागांमध्ये फारसा पाऊस पडत नाही. पण अधून मधून तुरळक पावसाची शक्यता. पुढील काही दिवसांमध्ये परिस्थिती अशीच राहील.

विदर्भात मात्र पावसाचं चित्र थोडसं वेगळं पाहायला मिळत आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि भंडारा या जिल्ह्यांसाठी Yellow Alert दिलेला आहे. मुसळधार सरी को सोडू शकतात त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी व शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करणे खूप आवश्यक आहे.

तर मराठवाड्या बाबत देखील पुरुष चित्र वेगळा आहे जालना, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव सारख्या जिल्ह्यांमध्ये पावसाची विश्रांती पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात, पण मोठ्या पावसाचा कुठेही अंदाज नाही. तर महाराष्ट्र नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार मध्ये तसंच चित्र आहे.

सध्या राज्यामध्ये पावसाची विश्रांती असले तरी राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने आजही अलर्ट दिलेला आहे त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी थोडीशी काळजी आणि खबरदारी घेणे खूप आवश्यक आहे आणि अशाच हवामान अंदाज साठी महाराष्ट्र बातमीला फॉलो करत चला.

हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज; अति मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज

Leave a Comment

error: Content is protected !!