Weather forecast : गेल्या अनेक दिवसापासून मराठवाडा, कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती यामुळे बळीराजा सुकवलेला आहे. परंतु काही ठिकाणी मोठा आर्थिक फटका देखील बसलेला आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा हवामान अंदाज वर्तवत राज्यातील कोकणपट्ट्यात व मुंबई परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आधीच काही ठिकाणी दैनंदिन जीवन विस्कळीत झालेले आहे. तर काही ठिकाणी पाणी साचणे, आणि निचऱ्याची गती कमी होणे यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे, आणि अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. गणेश उत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपलेला आहे आणि हवामान खात्याने नागरिकांना एक मोठा हवामान अंदाज वर्तवला. Weather forecast
आज 22 ऑगस्ट रोजी हवामान खात्याने दिलेल्या अपडेट नुसार, मुंबई शहर व उपनगरांमध्ये कोणताही हवामान अलर्ट जारी केलेला नाही. तसेच सकाळपासून काही ठिकाणी हलका पाऊस पडत असला तरी मुसळधार पावसाचा जोर कमी झालेला आहे. त्यामुळे रस्त्यातील वाहतिक सुरळीत होत असून बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
गेल्या मागच्या दोन दिवसांपूर्वी ठाणे आणि नवी मुंबई परिसरामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली होती आणि जोरदार पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल झाले. परंतु आता आकाश ढगाळ असून अधून मधून हलक्या सारी पडत आहेत हवामान खात्याने कोणताही अलर्ट दिलेला नाही त्यामुळे नागरिकांना हा मोठा दिलासा आहे.
तर आज हवामान खात्याने दिलेल्या अपडेट नुसार, पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर मागील काही दिवसांपासून कमी झाला आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी जलसाठा व वाहतुकीच्या समस्या निर्माण झालेल्या होत्या. परंतु आता या भागात पावसाचे प्रमाण कमी झाले असल्यामुळे परिस्थिती सुधारलेली आहे. तर हवामान विभागाने या पार्श्वभूमी वरती कोणताही इशारा दिलेला नाही. यामुळे जनजीवन सुधारित होत आहे.
तसेच हवामान खात्याने रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आज कोणताही धोका नाही आणि हवामान स्थिर असून हलक्यासरी पडत आहेत. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे. पुढील काही तासांमध्ये येथे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. यामुळे नागरिकांनी आणि शेतकरी बांधवांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य नियोजन करायचे आहे.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे. स्थानिक हवामानामध्ये बदल असू शकतो त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष द्या. )
हे पण वाचा | हवामान खात्याची मोठी अपडेट! या भागात मुसळधार पावसाचा इशारा