Weather update : हवामान खात्याचा मोठा इशारा; पुढील 24 तासात ‘या’ भागात होणार तुफान पाऊस?


Weather update : राज्यामध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाचं वातावरण पाहायला मिळत आहे. ज्या जुलै महिन्यामध्ये पावसाची गरज होती त्याच महिन्यात पावसाने दांडी मारली आणि आता ऑगस्ट महिन्यामध्ये हजेरी लावली आहे. परंतु हा पाऊस योग्यच असल्याचा देखील म्हटले जात आहे. कारण शेतातील पिके सुकू लागली होती आणि या पावसाने मोठा दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांमधून देखील समाधान व्यक्त केले जात आहे. अशातच पुन्हा एकदा भारतीय हवामान(IMD) खात्याने राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नवीन अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. Weather update

(शेती विषयक माहिती आणि हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा)

पावसाने थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे, यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळालेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार((New forecast from the Meteorological Department) राज्यात आज ढगाळ वातावरण राहील आणि अधून मधून पाऊस देखील पडू शकतो.

मुंबईत सकाळपासून ढग जमा झालेले आहेत दुपारनंतर हलक्या त्या माध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. कमल तापमान सुमारे 30°c आणि किमान तापमान 27 सेल्सिअस राहील. मात्र आद्रतेचे प्रमाण जास्त असल्याने दमट उकाडा जाणवणार आहे.

ठाणे आणि नवी मुंबईमध्ये दिवसभर रिमझिम पाऊस सुरू राहील. काही ठिकाणी पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता देखील भारतीय हवामान (India Meteorological Department) खात्याने वर्तवली आहे. या भागात कमाल तापमान 29°c किमान तापमान 26° c आणि वाहतुकीसाठी नागरिकांनि वेळेचे नियोजन करावा असा सल्ला देखील दिला गेलेला आहे.

पालघर जिल्ह्यामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे सकाळी आणि संध्याकाळी पावसाचा जोर वाढू शकतो. कमल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25°c राहील. पाऊस शेतकऱ्यांसाठी खूप दिलासादायक आणि महत्त्वाचा ठरला आहे.

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण आणि रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमल तापमान 29 ते 30°c तर किमान तापमान 25 ते 26 अंश सेल्सिअस राहील. समुद्रकिनारी लाटा उंच उसळण्याची शक्यता आहे मासेमारी साठी जाताना काळजी घ्यावी, असा इशारा देण्यात आलेला आहे.

हे पण वाचा | IMD Weather Update : राज्यावरती ऑगस्ट महिन्यात एक मोठे संकट; आयएमडीचा नवीन अंदाज

Leave a Comment

error: Content is protected !!