Weather Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे राज्यात पावसाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी शेतामध्ये तर काही ठिकाणी गावामध्ये पाणी शिरलेले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाल असून काही ठिकाणी जीवित हानी झाली असल्याच देखील समोर आलेल आहे. अशातच हवामान खात्याने पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सावध राहणे गरजेचे आहे. Weather Update
हवामान खात्याचा नवीन अंदाज काय ?
राज्यात काल रात्रीपासून पावसाच थैमान सुरू याच पार्श्वभूमी वरती हवामान खात्याने आणखी पावसाचा जोर वाढणार अशी शक्यता वर्तवलेली आहे. राज्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी तसेच गोदावरी, सिंधफना, सरस्वती, मांजरा, कुंडलिका अशा मोठ्या नद्यांना पूर आलेला आहे. मागील 24 तासांमध्ये बीड जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे पूर्जन्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी सर्व लघु, मध्यम प्रकल्प भरलेले आहेत. तर जवळपास जिल्ह्यातील 32 गावांचा संपर्क तुटला आहे मागील 24 तासात जिल्ह्यातील अठरा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. याच पार्श्वभूमीवरती या भागातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
तर राज्याच्या राजधानी मध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने कहर केला असून भारतीय हवामान खात्याने अत्यंत मोठा इशारा दिलेला आहे. पुढील तीन तास मुंबई, पुणे, रायगड जिल्ह्यासाठी धोक्याचे ठरणार असल्याचे सांगत थेट या ठिकाणी Red alert जारी करण्यात आलेला आहे. प्रशासनाने नागरिकांना पष्ट सांगितला आहे की, फारच गरज नसेल तरच घरा बाहेर पडू नका.
मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून लोकल सेवेवर त्याचा फटका. मध्य रेल्वेच्या गाड्या 15 ते 20 मिनिटांनी उशिरा धावताय. वेस्टन लाईन आणि हरबर लाईन परशाची फारशी वेगळी नाही.
फक्त मुंबईतच नाही तर बार्शी तालुक्यात देखील मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. दोन दिवसांच्या सततच्या पावसामुळे नदी नाले तडंब भरून वाहत आहेत. चांदणी नदी परिसरात पूर परिस्थिती निर्माण झालेली. हवामान विभागाने सांगितलेला आहे की पुढील तीन तासांमध्ये मुसळधार पावसाबरोबरच वाऱ्यांचा व्यक्तीस ते चाळीस किमी प्रति तास इतका राहू शकतो. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि रायगड मध्ये मोठे संकट ओढाऊ शकतं. आधीच अनेक धरण ओव्हर फ्लो झाले आहेत आणि नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे यामुळे अनेक ठिकाणी मोठी जीवित हानी आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याच पार्श्वभूमी वरती हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे इशारा अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यामुळे प्रशासनाच्या सूचना पाळा आणि वेळोवेळी सतर्क रहा.
