Zodiac Signs | आज २० जुलै २०२५ रविवार, आणि हा दिवस सूर्यदेवाला समर्पित. श्रावणाच्या सुरुवातीला येणाऱ्या या रविवारी काही राशींसाठी ग्रहांचे संयोग शुभ परिणाम देणारे ठरत आहेत. विशेषतः ज्या व्यक्ती आपल्या करिअरमध्ये बदलाच्या वाटेकडे पाहत होते, त्यांच्यासाठी आजचा दिवस काहीतरी नव्याची सुरुवात देणारा असणार आहे. चला तर बघूया आजच्या राशीभविष्यानुसार कोणत्या ३ भाग्यशाली राशींना मिळणार मोठा फायदा. Zodiac Signs
मेष रास : आजचा दिवस मेष राशीसाठी फारच निर्णायक ठरणार आहे. करिअरच्या बाबतीत तुम्ही जे काही पाऊल उचलण्याच्या विचारात होता, त्यासाठी आता वेळ अनुकूल झाली आहे. ऑफिसमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता असून, वरिष्ठांचे कौतुकही मिळेल. नोकरीत बदल अथवा प्रमोशनसारखी चांगली बातमी येऊ शकते. आर्थिकदृष्ट्याही स्थैर्य मिळेल, पण खर्चावर थोडं नियंत्रण ठेवा. नात्यांमध्ये संवाद वाढेल, घरात वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद लाभेल. आरोग्याच्या बाबतीत थोडा थकवा जाणवेल, पण सूर्याला जल अर्पण केल्यास चैतन्य मिळेल.
वृषभ रास: वृषभ राशीसाठी रविवार फारच सकारात्मक दिसतोय. व्यवसायात किंवा नोकरीत नवी संधी तुमचं दार ठोठवू शकते. ज्यांनी नुकतीच गुंतवणूक केली आहे, त्यांना लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होणार असून, आर्थिक अडचणी दूर होतील. जुन्या मैत्रीत सुधारणा होईल, दूर गेलेले नाते पुन्हा जवळ येईल. मानसिक थकवा असला तरी तो कुटुंबासोबत वेळ घालवल्यास निघून जाईल. गूळ व लाल फुलं सूर्याला अर्पण केल्यास दिवस अधिक शुभ ठरेल.
मिथुन रास : आज मिथुन राशीच्या लोकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी नीट विचार करावा. दिवस तुमच्या बाजूने आहे, पण घाईने केलेला निर्णय नुकसानही करू शकतो. व्यापार-उद्योग करणाऱ्यांना नवा क्लायंट मिळू शकतो, ज्यामुळे अचानक धनलाभ होऊ शकतो. प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा ठेवा, मनातल्या भावना मोकळेपणानं बोलल्यास नातं बहरेल. आरोग्याच्या दृष्टीने पचनाचा त्रास जाणवू शकतो, त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा. ‘आदित्यहृदय स्तोत्र’ पठण केल्यास मनःशांती मिळेल आणि दिवस चांगला जाईल.
(Disclaimer | वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)