IND vs PAK: क्रिकेटमध्ये भारत पाकिस्तान सामना म्हटलं की चाहत्यांच्या मनात वेगळीच ऊर्जा संचारते. वेगळाच जल्लोष आणि उत्साह दिसतो. सध्या आशिया कप 2025 स्पर्धा सुरू आहे. या टूर्नामेंट मध्ये टीम इंडियाने सलग सहा विजय मिळवत आपला किल्ला अभयद्य ठेवला आहे. आज भारत विरुद्ध पाकिस्तान फायनल सामना होणार आहे. या सामन्यांमध्ये जो संघ विजयी होईल तो आशियाचा बादशहा ठरेल. टीम इंडियाने यापूर्वी युएई, ओमान, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तानला दोन वेळेस हरून फायनल मध्ये एन्ट्री केली आहे. आता अंतिम फेरीत पुन्हा एकदा पाकिस्तान भारतासमोर आव्हान घेऊन आले आहे. या सामन्यांमध्ये नेमकं काय घडेल याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष आहे.
इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय…
आशिया कपच्या 41 वर्षाच्या इतिहासात प्रथमच भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत आमने-सामने येत आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान या महा मुकाबला कडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या ठिकाणी दोन्ही संघ पूर्ण ताकद लावून जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. आतापर्यंत या टूर्नामेंट मध्ये किंवा यापूर्वीचा इतिहास जरी पाहिला तरी भारत नेहमीच पाकिस्तानवर भारी ठरला आहे. मात्र फक्त फायनल मध्ये जर पाकिस्तानने गेम चेंज केला तर भारतासाठी हे आव्हानात्मक ठरू शकते. India vs Pakistan
दुबई इंटरनॅशनल स्टेडियम मधील दोन्ही संघाची आकडेवारी
दुबईमध्ये भारत पाकिस्तान सामना आतापर्यंत पाच वेळा t20 फॉर्मेट मध्ये झाला आहे. भारताने यामध्ये तीन वेळा विजय मिळवला आहे तर पाकिस्तान ने दोन वेळा बाजी मारली आहे. दुबई मध्ये सुरुवातीला पाकिस्तान आघाडीवर होते मात्र मागील काही सामन्यापासून भारताने सलग विजय मिळवून 3–2 अशी आघाडी धरली आहे. या सामन्यामध्ये दोन्ही संघ आपला उत्कृष्ट परफॉर्मन्स देऊन एशिया कपची बादशाही मिळवण्याचा प्रयत्न करतील. एवढं असलं तरी अंतिम फेरीत मानसिक बळ भारताकडे असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
यापूर्वीच्या आठवणी…
24 ऑक्टोबर 2021 रोजी पाकिस्तानने भारताला 10 विकेट ने इतिहासातला सर्वात मोठा पराभव दिला होता. तो पराभव भारतातील चाहत्यांच्या मनावर लागला होता. मात्र त्यानंतरच्या प्रत्येक सामन्यांमध्ये टीम इंडियाने जोरदार पुनरागमन करून पाकिस्तानवर विजय मिळवलेला आहे. विशेष म्हणजे 2022 मध्ये झालेल्या सामन्यांमध्ये विराट कोहलीचे जबरदस्त रणचेज आजही चाहत्यांच्या आठवणीत ताजे आहेत. ती मॅच खूप रोमांचक झाली होती आणि शेवटी भारताने विजय मिळवला होता. तशा प्रकारचा सामना आज पाहण्यास मिळू शकतो. IND vs PAK
काय होणार? पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता..
एशिया कप 2025 चा फायनल रविवारी 28 सप्टेंबरला भारत vs पाकिस्तान रंगणार आहे. भारत विजयाचा चौकार लावून सलग चौथ्यांदा एशिया कप जिंकणार का? का पाकिस्तान पहिल्यांदा भारताविरुद्ध अंतिम फेरीत ट्रॉफी उचलून इतिहास नोंदवणार? या रोमांचक सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. दोन्ही संघांना मॅच जिंकण्यासाठी आव्हानात्मक कामगिरी करावी लागणार आहे.
क्रिकेट म्हणजे केवळ चेंडू आणि फटके एवढेच नव्हे तर यामध्ये चाहत्यांच्या भावना, अभिमान आणि देशभक्तीची लढाई देखील असते. भारतीय क्रिकेट प्रेमी पाकिस्तानाविरुद्ध भारताचा पराभव होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे पाकिस्तान मधील क्रिकेट प्रेमी देखील भारताविरुद्ध झालेला पराभव पाहू शकत नाहीत. दुबई मध्ये होणाऱ्या या भारत पाकिस्तान सामन्याने पुन्हा एकदा हे सिद्ध होणार आहे की, आशियाचा बादशहा कोण आहे?

1 thought on “IND vs PAK: कोण ठरणार आशियाचा बादशहा? टीम इंडिया दुबईत विजयी होण्यासाठी सज्ज, पाकिस्तान रोखणार का?”